Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामना अग्रलेख : महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला! शिवसेना – संभाजी ब्रिगेडही लढणार आणि जिंकणार!!

August 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
saamana editorial shivsena- sb together

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. या युतीवरून आता सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यावरून संभाजी ब्रिगेड आणि आम्ही लढू आणि जिंकू या मथळ्याखाली सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला! शिवसेना – संभाजी ब्रिगेडही लढणार आणि जिंकणार!! असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणे ही राज्यातील मोठ्या परिवर्तनाची चाहुल!!

  • शिवसेनेप्रमाणेच संभाजी ब्रिगेडही महाराष्ट्रातील सळसळत्या रक्ताची संघटना आहे.
  • माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या सामाजिक, राजकीय, लोककल्याणकारी आणि महाराष्ट्र धर्माशी इमान राखणाऱ्या संभाजी ब्रिगेडने कठीण काळात शिवसेनेस प्रेमाचे आलिंगन द्यावे यापेक्षा मोठा राजधर्म कोणता असेल?
  • महाराष्ट्र हित रक्षणासाठी, राज्याच्या स्वाभिमान रक्षणासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणे ही राज्यातील मोठय़ा परिवर्तनाची चाहुल आहे.
  • आज शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी खुपसले आहेत.
  • छत्रपती संभाजीराजांचे औरंगजेबाने हालहाल केले.
  • कारण राजे धर्मरक्षक होते.
  • दिल्लीच्या बादशहाने छत्रपती शिवरायांना दिल्लीत बोलावून अपमानित केले व नंतर बंदी बनवले.
  • कारण छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे कार्य हाती घेऊन दिग्विजयाच्या दिशेने झेपावले होते.
  • शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी शिवराय – संभाजीराजेप्रेमी संघटनादेखील दिल्लीतील बादशाहीच्या डोळय़ात खुपू लागली आहे.
  • म्हणूनच शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर खुपसून महाराष्ट्राच्या भूमीत बेइमानी व दुहीचे बीज त्यांनी फेकले.
  • या कठीण समयी संभाजी ब्रिगेडसारखी जहाल , सळसळत्या रक्ताची संघटना भावाच्या मायेने पाठीशी उभी राहिली याची इतिहासाला घ्यावीच लागेल.
  • सर्वत्र गद्दारीचा मुसळधार सुकाळ सुरू आहे.
  • इमानाचे शेपूट आत घालून जो तो आपल्या बेइमानीचे सर्टिफिकेट दाखवण्यासाठी पुढाकार घेत असताना गेल्या पंचविसेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या गावखेडय़ात काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा हात पकडला आहे हे शुभ लक्षण आहे.
  • संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांनी स्पष्टच सांगितले , आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहोत , ते सत्यच आहे .
    संभाजी ब्रिगेडशी संवाद आणि युती ही फक्त सुरुवात आहे .

आज मतलबापोटी शिवरायांचे जपज्याप सुरू!!

  • महाराष्ट्राच्या हितासाठी आणखी काही महत्त्वाचे घटक लवकरच एकत्र येतील व स्वाभिमान – अभिमानासाठी रणशिंग फुंकले जाईल.
    सर्व राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन महाराष्ट्र हिताच्या शिखराकडे पाहायला हवे.
  • दुसऱ्या महायुद्धात जी राष्ट्रे एकमेकांविरुद्ध उभी ठाकली होती, एकमेकांच्या मोठय़ा प्रमाणावरील विनाशास कारणीभूत झाली होती, तीच राष्ट्रे आज इतिहास आणि वैर विसरून एकमेकाला नव्याने सहकार्य करण्यास पुढे आली आहेत.
  • या एकाच उदाहरणावरून महाराष्ट्र स्वाभिमान्यांना धडा घेता येईल.
  • दुसऱ्या महायुद्धामध्ये जी राष्ट्रे बेचिराख झाली होती त्यांनीही परस्परांतील भेदाभेद विसरून आपापल्या राष्ट्रांची पुनर्बांधणी केली आणि जुन्या दुश्मनांशी मनोमिलन केले.
  • इतिहासातील किंवा भूतकाळातील काही घटनांना जाणीवपूर्वक कोळशाप्रमाणे उगाळत बसण्यात अर्थ नाही हे आता ध्यानी घेतले पाहिजे.
  • आज महाराष्ट्र स्वाभिमान्यांची बरीचशी शक्ती धर्म आणि जात यांच्या नावाने शिमगा करीत, एकमेकाला डिवचण्यात, हल्ले करण्यात खर्ची पडत आहे.
  • त्यातून एकमेकांचेच बळ कमी होत आहे आणि याचाच फायदा भाजपसारखे लोक देशभर घेतात, हे लक्षात घ्यायला हवे.
  • दुसरे असे की, हे आजचे भाजपवाले व त्यांचे सध्याचे 40-50 ‘ खोके हराम ‘मांडलिक ऊठसूट शिवरायांचे नाव घेत असतात, पण राष्ट्रभक्तीसाठी निःस्वार्थ भावनेने केलेली इतिहासाची उजळणी वेगळी, शिवराय – संभाजीराजांचे नामस्मरण वेगळे आणि या ना त्या मतलबी कारणाने शिवरायांचे नाव घेणे वेगळे.
  • आज मतलबापोटी शिवरायांचे जपज्याप सुरू आहेत.
  • या सर्व ढोंगावर प्रहार करण्यासाठी संभाजी ब्रिगेड नामक मर्द मावळयांची फौज शिवसेनेच्या सोबतीस आली आहे.
    ही एका नव्या वाटचालीची सुरुवात आहे.

आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा !

  • संभाजी ब्रिगेडचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर हे महाराष्ट्र धर्म मानतात.
  • ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारांचे पाईक आहेत.
  • प्रबोधनकार हिंदुत्वाचे झुंजार शिपाईगडी होतेच.
  • त्यामुळे जास्तीत जास्त एकमतावर दोन लढाऊ संघटनांची ‘युती’ झाली आहे, असे समजा!
  • नाहीतरी ज्या भाजपबरोबर आम्ही पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या नावाने नांदलो, त्यांनी तरी हिंदुत्वाचा असा कोणता दिवा पेटवला?
  • राजकीय स्वार्थाचाच सगळा बाजार आणि लिलाव होता.
  • तिकडे कश्मीरात भाजपने तर फुटीरतावादी मेहबुबा बाईच्या पक्षाशी असंग केला आणि वर हीच मंडळी जगाला हिंदुत्वाचे पाठ पढवत आहेत.
  • नाही म्हटले तरी राम मंदिर वगैरे विषयांना विरोध करणाऱ्या नितीश कुमारांशी त्यांनी बिहारात ‘पाट’ लावलाच होता व नंतर त्यांच्या पाठीत खंजीरही खुपसला.
  • सध्याच्या भाजप मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाचा खोटा उमाळा आलाच आहे म्हणून बाळासाहेबांचा एक सत्य विचार सांगतो.
  • ‘घातकी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा! ‘असे बाळासाहेब म्हणत. आता ‘आपण नक्की कोण?’ हे भाजपने ठरवायचे.
  • यांना ना हिंदुत्व प्यारे ना शिवराय.
  • यांना फक्त सत्ता प्यारी आहे.
  • त्या सत्तेसाठी त्यांनी महाराष्ट्राच्या इज्जतीशी खेळ सुरू केला.
  • अर्थात अशा गद्दारांना महाराष्ट्र अनेकदा पुरून उरला आहे.
  • शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे.
  • छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे.
  • ते खरे धर्मवीर होते.
  • त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले.
  • त्या काळात औरंगजेबाकडे ‘ईडी’चा खंजीर नव्हता.
  • नाहीतर त्याने त्याचाही वापर केला असता.
  • छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला.
  • महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला.
  • आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत.
  • आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा !

Tags: BJPMaharashtrasaamana editorialsambhaji brigadeShivsenaभाजपामहाराष्ट्रशिवसेनासंभाजी ब्रिगेडसामना अग्रलेख
Previous Post

गणेशोत्सवात भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची लुटमार

Next Post

अंगणवाडी सेविकांचा सरकारविरोधी एल्गार! ‘अप’मानधन नको, हक्काचं वेतन द्या! न्याय द्या सरकार!

Next Post
Aganwadi sevika

अंगणवाडी सेविकांचा सरकारविरोधी एल्गार! 'अप'मानधन नको, हक्काचं वेतन द्या! न्याय द्या सरकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!