Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गणेशोत्सवात भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची लुटमार

आर्थिक लुट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात 'सुराज्य अभियान’चे मुंबईत आंदोलन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Andolan_Private Travels_Surajya A

मुक्तपीठ टीम

राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसेच्या दीडपटच दर आकरण्याचा शासनाचा निर्णय असतांना गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांकडून खासगी ट्रॅव्हल्स तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर आकारून प्रवाशांची प्रचंड लुटमार करत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर तिकिटांचे भरमसाठ तिकिटदर उघडपणे देण्यात आले आहेत. अशा प्रकारे नागरिकांची उघडपणे आर्थिक लुट चालू असूनही त्यांवर प्रशासन कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’च्या वतीने मुंबईतील दादर (पूर्व) येथील खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग केंद्रांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाविकांची आर्थिक लुट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

खासगी ट्रॅव्हल्स दरवाढीच्या विरोधात राज्य परिवहन विभागाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणारे अभिषेक मुरुकटे, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सतिश कोचरेकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते आणि प्रवासी सहभागी झाले होते. या वेळी आंदोलकांनी घोषणा देत, हातात फलक धरत खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

तिकिटदरात नियमबाह्य वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणार्‍या ट्रॅव्हल्सवर सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करूनही पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडून होत असेल, तर अशा प्रकरणात भा.दं.वि. कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात यावा, खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बुकिंग होणारी ठिकाणे आणि गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार खासगी अधिकतम किती दर आकारता येईल, याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या सोयीसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक द्यावेत आदी विविध मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या.


Tags: GaneshUtsav 2022Hindu JanjagrutiPrivate TravlesSurajya Abhiyanखासगी ट्रॅव्हल्सगणेशोत्सवसुराज्य अभियान
Previous Post

“अंगणवाडी सेविकांचा सरकारविरोधी एल्गार! लाज आणणारं ‘अप’मानधन आता तरी वाढवलंच पाहिजे!!”

Next Post

सामना अग्रलेख : महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला! शिवसेना – संभाजी ब्रिगेडही लढणार आणि जिंकणार!!

Next Post
saamana editorial shivsena- sb together

सामना अग्रलेख : महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला! शिवसेना - संभाजी ब्रिगेडही लढणार आणि जिंकणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!