Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“’ते’ पत्रच मोदींना पाठवून केंद्रीय यंत्रणांच्या त्रासाकडे लक्ष वेधता येईल!”

लेटर बॉम्बची वातच काढण्याचा शिवसेना संजय राऊतांचा 'ताजा कलम' प्रयत्न

June 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sanjay raut- pm narendra modi

मुक्तपीठ टीम

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून सरनाईकांच्या पत्रावर कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत यांनी ‘ताजा कलम’ अग्रलेखातून मोदींशी जुळवून घेण्याचा प्रश्नच नाही कारण वाकडं आहेच कुठे, असा प्रश्न उपस्थित करतानाच सरनाईकांचे पत्रच पंतप्रधानांकडे पाठवत केंद्रीय तपास यंत्रणांच्या नाहक त्रासाकडे लक्ष वेधता येईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे सरनाईकांच्या पत्रामागून आघाडीत बिघाडीचे राजकारण करु पाहणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात, त्याच पत्रातील केंद्राविरोधातील मजकूर उलटवण्याचा राऊतांचा प्रयत्न हा लेटरबॉम्बची वात काढण्याचा असल्याचे दिसत आहे.

मोदींशी ‘वाकडे-तिकडे’ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा प्रश्न येतो कुठे?

• पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत.
• त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे.
• महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे.
• मुळात ‘वाकडे-तिकडे’ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे?
• केंद्रीय यंत्रणांचा विनाकारण त्रास सरनाईकांचे पत्र पुढे पाठवून दाखवता येईल
• तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल.
• आमच्या लेखाचाही ताजा कलम इतकाच आहे की, शिवसेना आमदारांच्या पत्राची क्रिया-प्रतिक्रिया संपली असेल तर पुढच्या कामास लागूया, असे आजच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणाले आहेत.

 

ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच

• केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे.
• त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे.
• सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत.
• ते त्यांचे वैयक्तिक मत असेल.
• एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे.
• ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत.

 

म्हणून सरनाईकांनी पत्र लिहिलं…

• सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे.
• आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे.
• एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.
• त्यांच्या या संपूर्ण पत्रातील विनाकारण त्रास ‘ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असे राऊतांनी सांगितले.

विनाकारण त्रास ‘ जो काही आहे तो हाच

• सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत आहे.
• उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहोळ्य़ात जे भाषण केले त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संघर्षाचे व शौर्याचे तोंडभरून कौतुक केले.
• ऐन निवडणूक मोसमात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला गेला होता.
• एवढेच नव्हे तर, विधानसभा निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री व इतर दोघांना ‘नारद’ घोटाळय़ात बेकायदेशीर अटक केली गेली.
• तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय कार्यालयात घुसून सगळ्यांचीच दाणादाण उडवली.
• त्या घोटाळयाचे इतर दोन प्रमुख नेते (त्यातले एक सुखेन्दू अधिकारी) भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे सीबीआयने टाळले.
• विनाकारण त्रास ‘ जो काही आहे तो हाच.
• जे गुन्हेगार आमच्याबरोबर आहेत ते सोडले जातील.
• जे भाजपबरोबर नाहीत त्यांना विनाकारण त्रास देऊन अडकवले जाईल हे धोरण पश्चिम बंगालात राबवले तेच महाराष्ट्रात राबविण्याची तयारी आधीच सुरू झाली आहे.

अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढायचे, की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकायचे?

• महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत.
• आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणारया प्रत्येकाने करायलाच हवा.
• बरे – वाईट दिवस येतच असतात.
• वाईट दिवसही निघून जातात.
• सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते.
• अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी ‘तह’ करून मांडलिकी पद्धतीने गुजराण करायची?
• मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतले असते तर दरयाखोऱ्यांत भटकून लढाया करण्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले नसते.
• मोगल बादशहाने त्यांना एखादी मनसबदारी बहाल केली असती व इतर राजांप्रमाणे शिवरायांना त्यावर पिढयान् पिढ्या गुजराण करता आली असती;
• पण शिवरायांनी तसे केले असते तर इतिहासपुरुष, महान योद्धा, स्वाभिमान, अभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण आज जसे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो तसे झालो नसतो.


Tags: BJPchief minister uddhav thackerayPratap Saranaikprime minister narendra modisaamana editorialsanjay rautShivsenaपंतप्रधान नरेंद्र मोदीममता बॅनर्जीसंजय राऊतसामना
Previous Post

“महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण”: आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

मराठा मूक आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित

Next Post
sc2

मराठा मूक आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!