Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“…बाळासाहेब आज हवे होते!” शिवसेना नेते संजय राऊत असं का म्हणालेत?

November 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Balasaheb Thackeray

मुक्तपीठ टीम

बुधवारी १७ नोव्हेंबरला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा देणारा अग्रलेख शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून लिहिण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी आजच्या अग्रलेखातून राज्यातले राजकारण, कंगना राणावतचे स्वातंत्र्यावरील वक्तव्य, अमरावतीमधील हिंसाचार यावर बाळासाहेब असते तर काय केलं असतं? यावर लिहिले आहे.

 

नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली!

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण आज आपण करीत आहोत.
  • देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की, ‘आज शिवसेनाप्रमुख हवेच होते’ असे जनतेला प्रकर्षाने वाटते.
  • संकटाचे वादळ घोंघावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली की, लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते.
  • बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ले झाले.
  • हिंदू वस्त्या, मंदिरांची तोडफोड झाली.
  • त्यानिमित्ताने त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलने केली.
  • त्या आंदोलनांमुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या.
  • या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले.
  • त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले.
  • हिंसाचार घडवण्यात आला.
  • रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे.
  • हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही.
  • तरीही त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच.
  • त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली.
  • बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची ‘बंद’ची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते.
  • उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू – मुसलमानांत दंगली घडविण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.
  • तुमचे राजकारण तुमच्या राज्यात.
  • त्यासाठी महाराष्ट्र का पेटविला, हाच प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी चाबूक कडाडल्यासारखा विचारला असता.

विचारवंत ही शिवी

  • बाळासाहेबांनी लोकांना लढण्याचा, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा मंत्र दिला.
  • आधी मराठी म्हणून व नंतर अखिल हिंदू समाज गलितगात्र होऊन ‘आलिया भोगासी’ अवस्थेत खितपत पडला असताना त्याला राष्ट्रसंजीवक मंत्र देऊन त्याच्यात नवचैतन्य निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे, हे विचारवंतांना आणि इतिहासकारांना मान्यच करावे लागेल.
  • आता गंमत अशी की, स्वतः बाळासाहेब हे स्वतःला विचारवंत वगैरे मानत नव्हते.
  • विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांच्या गोतावळ्यात ते कधी रमले नाहीत.
  • विचारवंत ही शिवी आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

 

पाच फूट जमिनीत गाडले असते

  • स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास सध्या रचला जात आहे.
  • १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे.
  • खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे.
  • त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारून महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, “होय होय, १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच ‘तारे’त बरळू लागले आहेत.
  • लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत, भगतसिंगांपासून चापेकर बंधूंपर्यंत सगळ्याना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते.
  • आज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष त्या गांजाच्या शेतीचे समर्थन करून स्वातंत्र्य, क्रांतिकारकांचा अवमान करीत आहेत.
  • म्हणूनच लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवे होते.
  • बाळासाहेब हे सर्वसामान्य नेते किंवा सामान्य राजकारणी पुरुष नव्हते.

बाळासाहेब ठाकरे तर गर्जनाच

  • प्रत्येक पिढीत नेते वा राजकारणी पुरुष अनेक असतात.
  • ज्याला खऱ्या अर्थाने राष्ट्राचा महापुरुष, हिंदुत्वाचा महापुरुष असे संबोधिता येईल असा बाळासाहेबांसारखा क्वचितच एखाद् दुसरा ‘पुरुष’ आढळला असता.
  • हा पुरुष आज शिवतीर्थावर विसावला आहे.
  • याच पुरुषाने महाराष्ट्रासह देशात लोकांच्या मनात चेतना निर्माण केली.
  • बाळासाहेब ठाकरे हे फक्त नाव नाही, तर गर्जनाच होती .

ओठात एक पोटात दुसरे हे बाळासाहेबांचे धोरण नाही

  • शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याला काय दिले, हा मोठा विचार करण्याजोगा प्रश्न आहे.
  • शिवसेनाप्रमुखांनी काळाचे आव्हान स्वीकारण्याचा मंत्र दिला.
  • प्रखर हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा हुंकार दिला! हिंदुत्वावर, हिंदू राष्ट्रावर व्याख्यान देणारे व लाठ्याकाठयांची प्रात्यक्षिके करणारे खूप होते, पण राजकारणात हिंदू म्हणून एकजूट करणे त्यांना जमले नाही.
  • शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हाती आधी हातोडा दिला.
  • तो हातोडा अयोध्येत निर्भयपणे चालवला.
  • म्हणून आज रामजन्मभूमीवर राममंदिर उभे राहत आहे.
  • त्यानंतर धर्माध शक्तींविरुद्ध हिंदूंच्या हातात तळपणाऱ्या तलवारी दिल्या.
  • हिंदू एकवटला, जात – पंथाच्या भिंती तोडून एक झाला व दिल्लीत हिंदू विचारांचे राज्य सुरू झाले ते आजतागायत व्यापक आहे!
  • गुजरात दंगलीनंतर सारे जग ‘मोदी हटाव, मोदी हटाव’च्या आरोळ्या ठोकीत असताना आणि त्या आरोळ्यांत भाजपचेच वरिष्ठ मंडळ सामील झाले असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दमदारपणे म्हणाले, “छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल.
    हिंदूंची उमेद मरेल!” हे असे बाळासाहेबांचे बेडर हिंदुत्व.
  • ओठात एक पोटात दुसरे हे धोरण नाही.
  • ढोंगाला साथ कधीच नाही.

 

नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर ‘लेक्चर’ देतात

  • महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते.
  • त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले.
  • हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली.
  • ‘मातृभूमीला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला , देशाचा, असे ठासून सांगितले.
  • विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते.
  • त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले.
  • त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर ‘लेक्चर’ देतात.
  • तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते! शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे.
  • एक योद्धा शिवतीर्थावरून बळ देत आहे! ते महायोद्धाच होते!!

Tags: amravatiBalasaheb thackeraykangana ranautsaamanasanjay rautShivsenaअमरावती हिंसाचारकंगना राणावतबाळासाहेब ठाकरेशिवसेनासंजय राऊतसामना
Previous Post

मुंबई मनपात ‘डीएनबी शिक्षक’ या पदावर २५ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

रिसायकल केलेला कागद मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक? वाद न्यायालयात!

Next Post
UP court

रिसायकल केलेला कागद मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक? वाद न्यायालयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!