Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूबद्दल भाजपाला साधी हळहळ का नाही?” : सामना अग्रलेख

April 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Prabhakar sail death case

मुक्तपीठ टीम

आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईल (३७) यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे शुक्रवारी मृत्यू झाला. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरूख खानकडून मागण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांमधले त्यातील आठ कोटी रुपये एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर प्रभाकर साईल यांनी आरोप होता. त्यानंतर अचानक प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या मृत्यूवरुन संशय व्यक्त केला जात आहे. प्रभाकर यांच्या मृत्यवरून आता राजकीय वातावरण चांगले तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रेलखात “सगळेच रहस्यमय” या मथळ्याखाली भाजपा आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

 

सतीश उकेंना जेरबंद केल्यानंतर आता प्रभाकर साईलचा आवाज कायमचा बंद केला!

  • मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नाप्रमाणेच प्रभाकर साईलचे काय झाले? तो का मेला? असे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत.
  • दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अॅड. सतीश उके यांना ‘ईडी’ने एका जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली.
  • जमीन घोटाळा हे निमित्त आहे.
  • अॅड. उके यांच्या अटकेचे कारण राजकीय दहशत निर्माण करणे हेच आहे.
  • अॅड. सतीश उके यांनी गंभीर अपराध, आर्थिक किंवा जमीन घोटाळे केले हे मान्य केले तरी ईडीने पहाटे घुसून त्यांना जेरबंद करण्यासाठी मनी लॉण्डरिंग, हवाला, स्मगलिंगसारखी ती प्रकरणे नव्हती.
  • महाराष्ट्राचे पोलीस अशा प्रकरणांचा तपास करून गुन्हेगारांना शासन करण्यास समर्थ आहेत.
  • पोलीस कमी पडले असते तर विरोधी पक्षाने त्या विरोधात आवाज उठविला असता, पण सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेतले व तुरुंगात डांबले.
  • सतीश उके यांनाही आपल्या जीवाची भीती वाटत आहे.
  • त्यामुळे गृहमंत्री वळसे – पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायलाच हवे.
  • सतीश उके यांना जेरबंद केल्यावर आता प्रभाकर साईलचा आवाज कायमचा बंद केला आहे.

 

प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला!

  • प्रभाकर साईल कोण, हे एव्हाना लोकांच्या लक्षात आलेच असेल.
  • शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण गाजले होते.
  • आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले.
  • आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्जचे सेवन केले नाही.
  • तरीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक करून सनसनाटी निर्माण केली.
  • याच प्रकरणात खंडणी मागण्याचाही प्रकार घडला.
  • आर्यनला कसे फसवले, एनसीबीचे अधिकारी धनिकांना खोट्या प्रकरणांत कसे अडकवत आहेत, याचा पर्दाफाश प्रभाकर साईल याने केला.
  • प्रभाकर साईल हा असा एक साक्षीदार ठरला की, त्याने एनसीबी अधिकाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून देशात खळबळ माजवली.
  • समीर वानखेडेंचा मुखवटाच या प्रभाकरमुळे फाटला.
  • राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण कसे बोगस आहे हे टप्प्याटप्प्याने पुराव्यांसह बाहेर काढले.
  • त्यातला एक महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल होता.
  • प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला.

 

पंतप्रधान म्हणून मोदींनीच प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे!

  • आता अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाला.
  • हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले, पण मृत्यू संशयास्पद आहे असे खुद्द गृहमंत्री वळसे-पाटील यांनाच वाटत आहे व त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
  • या सर्व प्रकरणातला खोटारडेपणा उघड करणारे मंत्री नवाब मलिक यांना ‘ईडी’ने आधीच तुरुंगात डांबले आहे.
  • आता पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला.
  • प्रभाकर हा क्रूझ ड्रग्ज प्रकरणातला प्रत्यक्ष साक्षीदार होता.
  • भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालविणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात प्रभाकर साईल निर्भयपणे उभा राहिला व शेवटपर्यंत तो सत्य बोलत राहिला.
  • केंद्रीय तपास यंत्रणांचा खेळ त्याच्या साक्षीने कोलमडून पडला.
  • मोदी यांनीच पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे.
  • कोणी सरकारविरुद्ध तक्रार केली की, ‘ईडी’चा ससेमिरा लावायचा, धाडींवर धाडी घालायच्या, कोणी सत्य सांगणारी साक्ष दिली की, त्याच्या जिवावर उठायचे असेच एकंदरीत दिसते.

 

भाजपाचे पुढारी केंद्रीय यंत्रणांची कड घेऊन भांडत होते!

  • प्रभाकरने आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांवर आठ कोटींच्या वसुलीचा आरोप लावला होता.
  • त्यामुळे झोनल डायरेक्टर वानखेडे हे अडचणीत सापडले होते व त्यांना एनसीबीतून बाहेर जावे लागले.
  • महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीतच देशात जे खूनशी राजकारण सुरू आहे ते अस्वस्थ करणारे आहे.
  • प्रभाकर साईलने सत्य सांगितले नसते तर आर्यन खानप्रमाणे अनेक जण यापुढेही केंद्रीय यंत्रणांच्या मनमानीचे व खंडणीखोरीचे बळी गेले असते.
  • प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले.
  • कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण हे एक राजकीय षड्यंत्र होते.
  • ज्या पद्धतीने भाजपाचे पुढारी त्या काळात केंद्रीय यंत्रणांची कड घेऊन भांडत होते, तो सर्वच प्रकार किळसवाणा होता.

 

प्रभाकर साईलचा मृत्यू रहस्यमय आहे!

  • भाजपाचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक संवेदना व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात, पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य वाटते.
  • एनसीबीचे अधिकारी ज्या भाजपा पुढाऱ्यांबरोबर त्या काळात ऊठबस करीत होते, त्यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना रहस्यमय तितक्याच संशयास्पद आहेत.
  • प्रभाकर साईलचा मृत्यू रहस्यमय आहे या संशयास त्यामुळे बळकटीच मिळते.
  • प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय? असे प्रश्न भाजपाच्याच गोटातून निर्माण व्हावेत.
  • त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे.
  • धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत.
  • महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे आव्हान स्वीकारायला हवे.

Tags: Aryan KhanBJPPrabhakar Sailsaamana editorialSameer WankhedeShivsenaआर्यन खान क्रुझ प्रकरणप्रभाकर साईलभाजपाशिवसेनासमीर वानखेडेसामना
Previous Post

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार ६२५ जागांवर करिअर संधी

Next Post

पंजाबमध्ये ‘आप’ सत्तेचा भाजपाला ताप! तेजिंदर पाल बग्गांच्या अटकेसाठी पंजाब पोलीस दिल्लीत!

Next Post
Tejindar Pal Singh Bagga

पंजाबमध्ये 'आप' सत्तेचा भाजपाला ताप! तेजिंदर पाल बग्गांच्या अटकेसाठी पंजाब पोलीस दिल्लीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!