Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंजाबमध्ये ‘आप’ सत्तेचा भाजपाला ताप! तेजिंदर पाल बग्गांच्या अटकेसाठी पंजाब पोलीस दिल्लीत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tejindar Pal Singh Bagga

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गा यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले आहे. बग्गा यांच्या वक्तव्यावरून पंजाबातील मोहाली सायबर क्राईमने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत आर्क्षेपार्ह टीका करून त्यांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीत पोहोचले आणि मग बग्गाच गायब असल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या. सोशल मीडियावर खूप आक्रमक असणारे बग्गा यांनी आपचे नेते अरविंद केजरीवालांवर हल्ला करणाऱ्या आतापर्यंत अनेकदा हल्ला केला होता. पण पोलीस हाती नसल्याने दिल्लीत सरकार असूनही आपला कारवाई करणं शक्य नव्हतं. आता मात्र पंजाब सारख्या पूर्ण राज्याचं सरकार हाती येताच आपने भाजपाच्या बग्गासारख्या नेत्यांना ताप देण्यास सुरुवात केली आहे.

 

बग्गा यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांवरही गुन्हे दाखल!

  • आम आदमी पार्टीचे (आप) प्रवक्ते सनी अहलुवालिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • बग्गा यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बग्गा यांच्यावर आहे.
  • दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरील वक्तव्यानंतर बग्गा यांनी यासंदर्भातील एक वादग्रस्त ट्विट केले आहे.
  • बग्गा यांनी धमकीच्या स्वरात एकामागून एक ट्विट केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

 

स्थानिक पोलिसांना न कळवता पंजाब पोलिसांच्या अटकेच्या प्रयत्नाचा आरोप!

  • तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सांगितले की, शनिवारी स्थानिक पोलिसांना न कळवता पंजाब पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते.
  • पंजाब पोलिस ज्या कारमधून आले होते, त्याचा क्रमांक पीबी६५ एके १५९४ आहे.
  • त्यांनी दिल्ली पोलिसांना विचारले की, मी आता लखनऊमध्ये आहे, पंजाब पोलिस मला न सांगता अटक करण्यासाठी येत आहेत.
    याचे कारण मला कळू शकते.
  • दुसऱ्या ट्विटमध्ये बग्गा म्हणाले की, माझ्याविरुद्ध एक नाही तर १०० एफआयआर करा, पण केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाला खोटे म्हटले तर मी निषेध करेन.
  • काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर ते हसत असतील तर मी निषेध करेन.
  • त्यासाठी मला जे काही परिणाम भोगावे लागतील त्यासाठी मी तयार आहे.

 

काय म्हणाले होते केजरीवाल?

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याच्या भाजपाच्या मागणीवर हल्ला चढवला.
  • ते म्हणाले होते की जर जास्तीत जास्त लोकांनी पाहावं अशी इच्छा असेल तर करमुक्त करण्यापेक्षा हा चित्रपट यूट्यूबवर टाका.
  • तसेच भाजपा या चित्रपटाचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
  • त्यांच्या या विधानानंतर बग्गा यांनी केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केले होते.

Tags: BJPdelhiPunjab PoliceTajinder Pal Singh Baggaअरविंद केजरीवालआपतेजिंदर पाल बग्गादिल्लीपंजाब पोलीसभाजपा
Previous Post

“आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूबद्दल भाजपाला साधी हळहळ का नाही?” : सामना अग्रलेख

Next Post

महाराष्ट्रासह ५ राज्यांमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची अचानक तपासणी! एकाची मान्यता रद्दही!!

Next Post
Mansukh Mandaviya

महाराष्ट्रासह ५ राज्यांमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची अचानक तपासणी! एकाची मान्यता रद्दही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!