Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल–गाझा संघर्षाइतकाच तीव्र”

सामना अग्रलेखातील केंद्र सरकारवर हल्ला-बोल, नव्या वादाची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
west bengal

मुक्तपीठ टीम

आज शिवसेने सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प. बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल–गाझा संघर्षाइतकाच तीव्र आहे. केंद्रविरुद्ध राज्य संघर्षाचे हे शेवटचे टोक आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा विजय मोदी–शहा यांनी इतका मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. पण सध्याच्या नव्या घडीत प्रत्येक जय–पराजय हा व्यक्तिगतरीत्या घेतला जातो. त्यामुळे जिंकलेल्या ममतांना नामोहरम करून नमवायचेच असे केंद्राने ठरवले असेल तर ते लोकशाही परंपरांना हरताळ फासत आहेत. पण बोलायचे कोणी? हे असेच चालू राहणार आहे, असे म्हणत केंद्रावर निशाणा साधला आहे. दैनिक सामनाने बंगालमधील सत्ता संघर्षाची तुलना इस्त्रायल-गाझा संघर्षाशी केल्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

काय म्हटलं सामनाच्या अग्रलेखात-

ममता बॅनर्जी आणि केंद्रातील संघर्ष हा इस्त्रायल,गाझा संघर्षाइतकाच तीव्र-

  • इस्रायल आणि गाझा संघर्षाइतकाच तीव्र संघर्ष सध्या ममता बॅनर्जी व केंद्र सरकारमध्ये सुरू आहे.
    केंद्रात मोदी – शहा आहेत तोपर्यंत तरी या संघर्षाला अंत नाही.
  • प. बंगालच्या निवडणुका संपल्यावर तेथे शांतता नांदेल, सर्व सुरळीत होईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही.
  • निवडणुकीत दारुण पराभव झाला, पण भारतीय जनता पक्ष पराभव स्वीकारायला तयार नाही व केंद्रीय तपास पथकांच्या माध्यमांतून ममता बॅनर्जीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.
  • या सगळया झगडयात पंतप्रधान मोदी यांचे नाव खराब होत आहे.
  • सोमवारी कोलकात्यात जे घडले ते देशाच्या इभ्रतीस शोभणारे नाही.
  • २०१४ सालच्या नारदा स्टिंग प्रकरणात सीबीआयने पश्चिम बंगालचे फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी हे विद्यमान मंत्री, सोवन चॅटर्जी हे माजी मंत्री आणि आमदार मदन मित्रा अशा चौघांना अटक केली.
  • हे चौघेही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत . नारदा स्टिंग प्रकरणात राजकीय नेते पैसे स्वीकारत असल्याचा भ्रष्टाचार कॅमेऱ्यात टिपला गेला.
  • हे गंभीर आहे, पण आश्चर्य असे की, या भ्रष्टाचारातील आणखी दोन आरोपी सुखेन्दू अधिकारी व मुकुल रॉय हे सध्या भाजपमध्ये आहेत.’

कारवाई का होत नाही?-

  • मी सुखेन्दू अधिकारी यांनाही पैसे दिले व तसे कॅमेऱ्यात आहे.
  • मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ‘हा प्रश्न आता ज्या नारदा न्यूजने स्टिंग ऑपरेशन केले त्यांच्या संपादकाने केला.
  • ज्यांनी भाजपात प्रवेश करून ममतांच्या विरोधात निवडणुका लढवल्या ते सगळे ‘नारदा’ भ्रष्टाचारात सामील असूनही आता शुद्ध झाले.
  • त्यामुळेच सी.बी.आय.ची कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच प्रेरित आहे असे म्हणायला जागा आहे.
    प. बंगालातील ममता सरकार लोकशाही मागनि सत्तेवर आले आहे.
  • ममता बॅनर्जी यांना नेस्तनाबूत करण्याचे सर्व अघोरी प्रयोग गेल्या वर्षभरात करून झाले, पण कोणतीही बंगाली जादू केंद्राला जमली नाही.
  • लोकशाहीत जय – पराजय खुल्या दिल्याने स्वीकारावे लागतात, पण बंगालातील ममतांचा विजय केंद्राला मान्य नाही व त्यांच्या सरकारला काम करू दिले जाणार नाही, असे धोरण ठरलेले दिसते .

राज्यपालांचे वागणे घटनाबाह्य-

  • प. बंगालात कोणत्याही मार्गाने अस्थिरता व अशांतता निर्माण करायचीच, ममता बॅनर्जीवर राजकीय अत्याचार करायचे व त्यासाठी राजभवनात बसवून ठेवलेल्या जगदीश धनकड यांचा निर्दयपणे वापर करायचा हे सूत्र ठरलेले दिसते.
  • ज्या दोन मंत्र्यांना व दोन आमदारांना सी.बी.आय.ने अटक केली ते विधानसभेचे सदस्य आहेत.
  • त्यांना अटक करण्याआधी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे गरजेचे होते.
  • तशी परवानगी घेतली गेली नाही.
  • पण राज्यपाल धनकड म्हणतात, ‘सीबीआयला आमदारांच्या अटकेची परवानगी आपण दिली आहे.
  • राज्यपालांचे वागणे घटनाबाह्य आहे.
  • अशा राज्यपालांना गृहमंत्रालयाने तत्काळ मागे बोलवायला हवे.
  • धनकड यांचे राजकीय व सामाजिक जीवन हे फार मोठे चमकदार कधीच नव्हते.
  • राजकारणात त्यांनी फार मोठी कामगिरी केली असेही नाही.
  • म्हणून केंद्राने एका महिला मुख्यमंत्र्याला छळून दाखवा अशी विशेष जबाबदारी दिली असेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने या महिला अत्याचाराची दखल घेणे गरजेचे आहे.
  • ममता बॅनर्जी यांच्या मंत्र्यांना व आमदारांना अटक केल्यावर राज्यातील वातावरण बिघडेल व आक्रमक स्वभावानुसार ममता दीदी रस्त्यावर उतरतील हे भाजपच्या केंद्रीय तपास पथकाला वाटले असावे व नेमके तसेच घडले.
  • हजारो समर्थकांसह ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या व सीबीआय कार्यालयावर चाल करून गेल्या.
  • मुख्यमंत्री बॅनर्जी तब्बल सहा तास सीबीआय कार्यालयात ठाण मांडून बसल्या.
  • “मी येथून जावे असे वाटत असेल तर तुम्हाला मला अटक करावी लागेल, ” असे त्यांनी सीबीआयला सांगितले .

 

ममता बॅनर्जीविरुद्ध पुकारलेले राजकीय युद्ध-

  • कोलकात्यातील वातावरण तणावपूर्ण झाले व राज्यपाल धनकड यांना तेच हवे असेल तर केंद्राच्या ‘मन की बात’लाच ते पुढे रेटत आहेत.
  • सीबीआयने अचानक सुरू केलेली कारवाई हे ममता बॅनर्जीविरुद्ध पुकारलेले राजकीय युद्ध असल्याचे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
  • वास्तविक, प. बंगालात कोरोनाची लाट उसळली आहे.
  • हजारो लोक जगण्या मरण्याचा संघर्ष करीत आहेत.
  • राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
  • असे असताना सीबीआय पथकाला हे सर्व प्रकरण थोडे संयमाने घेता आले असते.
  • ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचेही चार दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले, पण सीबीआयला कोलकात्यात गोंधळ निर्माण करायचाच होता हे आता स्पष्ट झाले.
  • ममता बॅनर्जी या निवडणुका जिंकून लोकशाही मार्गाने सत्तेवर आल्या.
  • त्या लोकशाहीचा असा कचरा करणे बरे नाही.
  • सीबीआय प. बंगालात भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करीत आहे हे मान्य, पण मग त्या कारवाईतून मुकुल रॉय, सुखेन्दू अधिकारीसारखे लोक का सुटले?
  • या लोकांनी भाजपात प्रवेश केल्याने सीबीआयने त्यांना उटणे वगैरे लावून अभ्यंगस्नान घातले काय?
  • प. बंगालमध्ये घडणाऱ्या घटना या लोकशाहीची पायमल्ली व संविधानाची दुर्गती आहे.
  • ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व संघर्षातून तावूनसुलाखून बाहेर पडलेले आहे.
  • हा संघर्षही देशाला नवी दिशा देईल.

Tags: Mamata Banerjeesaamana editorialwest bengalपश्चिम बंगालममता बॅनर्जीसामना अग्रेलखसी.बी.आय.सुखेन्दू अधिकारी
Previous Post

“आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?”

Next Post

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीकडून निर्णयांचा आढावा

Next Post
maratha

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीकडून निर्णयांचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!