मुक्तपीठ टीम
गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरुच आहे. आतापर्यंत या युद्धात ३५२ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्र महासभेची विशेष बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तिबेटचे आध्यात्मिक नेते आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी युद्धग्रस्त देशात “शांतता आणि संवादाचे आवाहन केले आहे. तसेच युद्ध ही जुनी पद्धत बनली असून अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे, असेही ते म्हणाले आहेत.
युद्ध ही आता जुनी पद्धत,अहिंसा हा एकमेव मार्ग…
- युक्रेनमधील संघर्षामुळे मला खूप दु:ख झाले आहे, असे दलाई लामा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
- आपले जग इतके परस्परावलंबी बनले आहे की दोन देशांमधील हिंसक संघर्षाचा इतरांवरही नक्कीच खोल परिणाम होईल.
- युद्ध ही आता जुनी पद्धत बनली आहे आणि अहिंसा हा एकमेव मार्ग आहे.
- इतरांना भाऊ-बहीण मानून संपूर्ण मानवजाती एक होण्याचा विचार आपण रुजवला पाहिजे.
- अशा प्रकारे आपण अधिक शांततामय जग निर्माण करू शकू.
संवादातून प्रश्न सोडवला जाईल…
- दलाई लामा म्हणाले की समस्या आणि मतभेद दूर करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे संवाद.
- तसेच परस्पर समंजसपणा आणि एकमेकांच्या हिताचा आदर यातूनच खरी शांतता निर्माण होते.
- युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, अशी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, आपण आशा सोडू नये.
- तसेच २० वे शतक हे युद्ध आणि रक्तपाताचे शतक होते. २१ वे शतक हे संवादाचे शतक असले पाहिजे