Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युक्रेनच्या युद्धात वेगळंच वळण: WHO म्हणतं युक्रेनला दिला होता प्रयोगशाळेतील घातक जीवाणू नष्ट करण्याचा सल्ला!

रशियाचा युक्रेनवर जैविक युद्धाचा आरोप, तर युक्रेनचा रशियावर विषारी वायूचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Russia will launch aie strike on ukraine

मुक्तपीठ टीम

रशिया युक्रेन युद्धाला आता नवं वळण आलं आहे. या युद्धात आता युक्रेनच्या सार्वजनिक प्रयोगशाळांमधील घातक जीवाणूंवर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने सुद्धा वक्तव्य केलं आहे. डब्लूएचओने युक्रेनला त्यांच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये साठवलेल्या घातक जीवणूचा नाश करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून त्यांच्या संभाव्य प्रसारामुळे लोकसंख्येमध्ये रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ नये. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता आपल्या सैन्याला विषारी वायूंनी हल्ले करण्याचे आदेश दिल्याचा दावा युक्रेनच्या प्रशासनाने केला आहे.

 

याचा उद्देश नुकसान रोखणे…

  • जीवाणूची गळती होण्याची शक्यता आणि त्यामुळे होणारे नुकसान रोखणे हा त्याचा उद्देश आहे.
  • यामुळेच युक्रेनमध्ये काहीही अनुचित होऊ नये म्हणून या जीवाणूंचा तात्काळ नाश करण्याची शिफारस करण्यात आली होती.
  • मात्र संस्थेने हा सल्ला केव्हा दिला हे सांगितले नाही किंवा युक्रेनियन प्रयोगशाळांमध्ये असलेल्या रोगजनकांची माहिती दिली नाही.
  • दुसरीकडे या संदर्भात युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

बॉम्बस्फोटामुळे गळतीचा धोका वाढला…

  • दुसरीकडे, जैवसुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया युक्रेनमध्ये ज्या प्रमाणात बॉम्बहल्ले होत आहेत आणि देशाच्या विविध भागांतून त्याचे सैन्य दाखल झाले आहे, त्यामुळे प्रयोगशाळांमधून चुकून जंतू पसरण्याची भीती वाढली आहे.
  • त्यामुळे ते गोळा केलेल्या अशा प्रत्येक ठिकाणाचा नाश करण्याची गरज आहे.

 

अमेरिका आणि युरोपने प्रयोगशाळांना केली मदत

  • इतर अनेक देशांप्रमाणेच युक्रेनमध्ये कोरोनासह इतर जीवाणूंचा मानव आणि प्राण्यांवर होणारा परिणाम शोधण्यासाठी अनेक प्रयोगशाळा आहेत, ज्यांना युरोपियन युनियन, अमेरिका आणि WHO कडून मदत मिळाली आहे.
  • अलीकडेच, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेवर या प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रे का तयार केल्याचा आरोप करत उत्तरे मागितले होते.
  • मात्र वॉशिंग्टन आणि कीव यांनी रशियाचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

 

युक्रेनवर गॅस हल्ला होण्याची शक्यता

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता आपल्या सैन्याला विषारी वायूंनी हल्ले करण्याचे आदेश दिल्याचा दावा युक्रेनच्या प्रशासनाने केला आहे. हल्ल्यादरम्यान विषारी वायूंपासून बचाव करण्यासाठी रशियन सैनिकांना गॅस मास्कही देण्यात आले आहेत.
  • त्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ, युक्रेनियन सैन्याने मीडियाला रशियन सैनिकांकडून जप्त केलेले गॅस मास्क देखील दाखवले.

Tags: air StrikeRussiaRussia-Ukraine WarUkraineVladimir PutinWHOयुक्रेनरशियावायू हल्ला
Previous Post

सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची वाढ

Next Post
vidhan bhavan

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!