मुक्तपीठ टीम
रशिया-युक्रेन युद्ध आजही धगधगतं असतानाच आता या युद्धाची धगधग अवकाशात पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनला साथ देणाऱ्या युरोपियन देशांना कधी गॅसबंदी, इंधनबंदी करुन उत्तर देणाऱ्या रशियाने आता थेट अवकाशातही त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रशियाने जर्मनीचा उपग्रह हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जर्मनीची अंतराळ संस्था पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाली आहे.
जर्मनीचे रशियाशी संबंध बिघडले!
- युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाचे अनेक देशांशी संबंध बिघडले आहेत.
- अनेक पाश्चात्य देशांनी रशियाशी असलेले संबंध पूर्णपणे तोडून युक्रेनला मदत पाठवली.
- यात जर्मनीचाही समावेश आहे.
- जर्मनीने रशियन स्पेस एजन्सी Roscosmos सोबतचे सहकार्य संपवले आहे.
- जर्मनीच्या या कृतीमुळे रशियन अधिकारी नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
रशियाला हवे आहे उपग्रहावर नियंत्रण!
- वास्तविक, काही वर्षांपूर्वी रशिया आणि जर्मनीने संयुक्त मोहिमेअंतर्गत अवकाशात उपग्रह पाठवला होता.
- आतापर्यंत हे दोन्ही देश या मोहिमेवर एकत्र काम करत होते.
- मात्र, जर्मनीने माघार घेतल्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी ते हॅक करण्याचा प्रयत्न केला.
- जर्मनीने माघार घेतल्यानंतर इरोसिटा उपग्रहाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.
स्पेस स्टेशन पाडण्याची धमकी!
- युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले.
- यानंतर रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने इंटरनॅशनल स्पेस एजन्सीबाबत मोठे वक्तव्य जारी केले आहे.
- रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन म्हणाले, आमच्याकडे ही ५०० टनांची रचना भारत आणि चीनमध्ये देखील सोडण्याचा पर्याय आहे.
- अशी शक्यता दाखवून त्यांना धमकावायचे आहे का? आयएसएस रशियावरून उडत नाही.
- अशा परिस्थितीत बंदी घालण्यापूर्वी तुम्हाला काय करावे लागेल हे जाणून घ्या?
- रशियाने म्हटले होते, रशियाने म्हटले आहे की, असेच सुरू राहिल्यास ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) क्रॅश करू शकते.