Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धावपटू अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम! १३.२५ मिनिटांमध्ये कापलं ५ हजार मीटर अंतर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Avinash Sable

मुक्तपीठ टीम

तीन हजार मीटरच्या स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेल्या अविनाश साबळेने ५ हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्याने १३.२५ मिनिटांत शर्यत पूर्ण करून बहादूर प्रसादचा ३० वर्ष जुना विक्रम मोडला. बहादूरने १९९२ मध्ये हा विक्रम केला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या या शर्यतीत अविनाशने १२ वा क्रमांक पटकावला, मात्र यादरम्यान त्याने राष्ट्रीय विक्रम केला. नॉर्वेच्या जेकबने १३ मीटर 2 सेकंदात शर्यत पूर्ण करून स्पर्धा जिंकली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ हजार ५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

अविनाश साबळे यांच्या नावावर ३ हजार मीटर स्टीपलचेसचा विक्रम

  • सर्वात कमी वेळेत ३ हजार मीटर स्टीपलचेस पूर्ण करण्याचा विक्रम अविनाश साबळे यांच्या नावावर आहे.
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये, अविनाश साबळेने ८:१८.१२ वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, परंतु अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.
  • या स्पर्धेत त्याने सातवे स्थान पटकावले. याआधीही तीन हजार मीटर स्टीपलचेसचा विक्रम त्याच्या नावावर होता.
  • साबळेने मार्च २०२१ मध्ये फेडरेशन कपमध्ये ८:२०.२० मिनिटांत शर्यत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला.

 Avinash Sable

३० वर्षांपासूनचा जुना रेकॉर्ड मोडला

  • महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला अविनाश हा लष्कराचा शिपाई आहे.
  • २७ वर्षीय तरुणाने बहादुर प्रसादचा राष्ट्रीय विक्रम मोडला, ज्याने १९९२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेत १३:२९.७० मिनिटांत शर्यत पूर्ण केली.
  • साबळेने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडला आहे.
  • तिरुवनंतपुरममधील भारतीय ग्रॅंड प्रिक्स दरम्यान, त्याने ८:१६.२१ मिनिटांत शर्यत पूर्ण करून सातव्यांदा स्वतःचा विक्रम मोडला.
  • १५ जुलैपासून अमेरिकेत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो आधीच पात्र ठरला आहे.

भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले की, आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशला ३००० मीटर स्टीपलचेस आणि ५ हजार मीटर शर्यतीत उतरवण्याची त्यांची योजना होती. दोन्ही स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. आशियाई खेळ १० ते १५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या हांगझोऊ येथे होणार होते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ते २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.


Tags: Avinash Sablegood newsmuktpeethNational recordRunner Avinash SableSteeplechase competitionअविनाश साबळेचांगली बातमीधावपटू अविनाश साबळेमुक्तपीठराष्ट्रीय विक्रमस्टीपलचेस स्पर्धा
Previous Post

शिक्षकांकडून वेतनश्रेणी मान्यतेसाठी लाच! दोन शिक्षण अधिकारी रंगेहात जेरबंद!!

Next Post

आता काशीच्या ज्ञानव्यापी मशिदीचा वाद! न्यायालयाचा सर्वेक्षण आदेशामुळे ओवेसींना आठवला अयोध्या संघर्ष!

Next Post
Asaduddin Owaisi

आता काशीच्या ज्ञानव्यापी मशिदीचा वाद! न्यायालयाचा सर्वेक्षण आदेशामुळे ओवेसींना आठवला अयोध्या संघर्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!