Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यसभेसाठी मतदान आणि अफवांचा बाजार…एकत्रच सुरु!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
uddhav thackeray sanjay raut sharad pawar

मुक्तपीठ टीम

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असतानाच अफवांचा बाजारही जोरात आहे. खरंतर मतदानापूर्वीच अफवांचं वारं सुटलं. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा वाढवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याच्या ब्रेकिंग चालल्या. अखेर शिवसेना नेते आणि या निवडणुकीतील एक उमेदवार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी भाजपावर चुकीच्या बातम्या पसरवण्याचा आरोपही केला.

कोणीही कोणावर नाराज नाही!

  • संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात मविआमधील नाराजीचा इंकार केला.
  • भाजपाकडून कालपासून अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
  • मविआच्या उमेदवारांना ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यावर अजिबात नाराज नाहीत. आताच माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली.
  • मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे.
  • कोणीही कोणावर नाराज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीसाठी काँटे की टक्कर, चुरस वगैरे केवळ भ्रम!!

  • संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून येतील, असा दावा केला.
  • संध्याकाळी सात वाजता चित्र स्पष्ट होईल.
  • राज्यसभा निवडणुकीसाठी काँटे की टक्कर, चुरस वगैरे असल्याचा केवळ भ्रम आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे.
  • आजच्या मतदानात हे आकडे स्पष्ट दिसतील.
  • महाविकास आघाडीला ठरल्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी भाजपा नेत्यांना धक्का बसू नये, हीच अपेक्षा करतो.

यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा…

  • राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना जिंकवून आणण्यासाठी एक-एक महत्त्वाचे असताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल केल्याची चर्चा होती.
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
  • त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ मतांचा कोटा राखून ठेवला होता.
  • त्यानंतर उर्वरित मतं ही शिवसेनेला दिली जाणार होती.
  • मात्र, आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ इतका करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय पवार यांची मतं कमी झाल्याची चर्चा सुरु झाली.
  • शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संतप्त झाल्याच्या बातम्या सुरु झाल्या.
  • त्यात काँग्रेसनेही धोका नको म्हणून सर्व ४४ मते इम्रान प्रतापगढी यांनाच देण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्याही आल्या.
  • जाणकारांच्या उमेदवाराची मते नेहमीच आवश्यक मतांपेक्षा एक-दोन मते जास्त ठेवली जात असतात.
  • तसेच दुसऱ्या पसंतीची मते ही सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडतील.

Tags: cm uddhav thackerayMaharashtaRajya Sabha electionsRumorssanjay rautsharad pawarअफवामहाराष्ट्रराज्यसभा निवडणुक
Previous Post

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन IBPSमध्ये करिअर संधी…लवकर करा अर्ज!

Next Post

बोटींना जाण्यासाठी जागा करून देणारा सागरी पूल!

Next Post
बोटींना जाण्यासाठी जागा करून देणारा सागरी पूल!

बोटींना जाण्यासाठी जागा करून देणारा सागरी पूल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!