देशातील रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम म्हणजेच आरटीजीएस सुविधा आता २४ तास उपलब्ध झालीय. यामुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल. भारत निवडक देशांमध्ये सामील होईल जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत असते. आरटीजीएसमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहारांमध्ये वापरली जाते. एनईएफटीवरून दोन लाख रुपयांपर्यंत ऑनलाईन व्यवहार करता येतो.
आरटीजीएस २६ मार्च २००४ रोजी लाँच केले गेले. त्यावेळी केवळ चार बँका पेमेंटची सुविधा देत होत्या. देशभरातील जवळजवळ २३७ बँका या प्रणालीद्वारे दररोज सव्वा लाख कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण करतात. त्यामुळे व्यवहारासाठी हा खरोखर उपयुक्त पर्याय ठरला आहे.
आरटीजीएस म्हणजे नेमके काय?
- आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात.
- एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात. एका वेळी ५०,००० रुपये हस्तांतरित होतात.
- विशेष म्हणजे तुम्ही जर नेटबँकिंग करत असाल तर बँकेत न जाता आपण आपल्या घरच्या संगणकाद्वारे आरटीजीएस ऑप्शनमध्ये जाऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यावयाची आहे त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँका कोड विचारणा करतात. तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा किंवा भारतीय रिझव्र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर आपणास संबंधित बँकेचा आयएफएस कोड मिळेल. मात्र असे व्यवहार करताना तुम्ही बँक अधिकारी यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे.