Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सर्व भारतीयांचा डीएनए एकच! गाय ही पूजनीय, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार!” – सरसंघचालक मोहन भागवत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mohan bhagwat

मुक्तपीठ टीम

“हिंदू-मुस्लिम एक आहेत. याचं कारण आपली मायभूमी. पूजा करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. भाषा, प्रांत आणि इतर विषमता सोडून सर्व भारतीयांनी आता एक होण्याची आणि भारताला विश्वगुरू बनवण्याची वेळ आली आहे. भारत विश्वगुरू झाल्यावरच जग सुरक्षित होईल,” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

 

भागवतांनी कट्टरतावादी हिंदूंना नाकारले!

  • गाय ही पूजनिय आहे.
  • भारत हिंदू राष्ट्र आहे, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार आहेत.
  • आम्ही कधीच त्यांचे समर्थन करत नाही.
  • जर हिंदू असे म्हणतात की एकही येथे मुस्लिमान राहू नये, तर तो हिंदू नाही. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण जे दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाविरोधात आहेत.
  • अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली पाहिजे.
  • राजकारणामुळे फुटिरतावाद निर्माण झाला आहे, तो हटवावा लागेल.

ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या पुस्तकाचे प्रकाशनामागे मतांचं राजकारण नाही!

  • मोहन भागवत डॉ ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या ‘वैचारिक समन्वय-एक पहल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आले होते.
  • डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद हे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहा राव यांचे सल्लागार होते.
  • आपण या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आल्याने यामागे मतांचे राजकारण आहे, असं इतरांनी समजू नये.
  • ते म्हणाले की पुस्तक न पाहताच मी त्याच्या प्रकाशनास होकार दिला आहे, कारण त्यात प्रामाणिकतेचं आवाहन आहे.

 

राजकारण हे स्वयंसेवकांचे कार्य नाही.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ राष्ट्रवादासाठी काम करतो.
  • संघ जोडण्याचे काम करतो, तर राजकारण हे तोडण्याचे शस्त्र बनण्यात येते.
  • केवळ राजकारणामुळे हिंदू-मुस्लिम एकत्र होऊ शकले नाहीत.
  • संघ निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद वापरत असतो पण जे काही करतो ते देशाच्या हितासाठी करतो.

 

अल्पसंख्याकांच्या मनात भीती

  • हिंदू-मुस्लीम वेगळे नाही तर एकच आहेत.
  • हिंदू-मुस्लीम एकता ही एक भ्रामक कल्पना आहे.
  • जेव्हा लोकं दोघांना वेगळं समजतात तेव्हा संकट उद्भवते.
  • आपल्या श्रद्धेचा आकार आणि निराकार दोन्ही समान आहेत.
  • आम्ही मातृभूमीशी प्रेम करतो. इथे राहणाऱ्या प्रत्येकाचं ती पालन पोषण करते.

 

देशाची वाढती लोकसंख्या ही भविष्यात धोका बनणार!

  • काही लोक अल्पसंख्याक म्हणतात, आम्ही म्हणतो आम्ही सर्व एक आहोत.
  • आम्ही हिंदू म्हणतो, तुम्ही भारतीय म्हणता.
  • शब्दांच्या भानगडीत पडू नका.
  • भारताला विश्वगुरू बनवायचे आहे.
  • हिंदू संपवून टाकतील असं अल्पसंख्यांकांवर बिंबवलं जातंय.
  • परंतु जेव्हा अल्पसंख्याकांवर बहुमताचा अत्याचार होतो तेव्हा बहुसंख्य लोकही त्याविरूद्ध आवाज उठवतात.
  • आग लावणारा भाषण देऊन प्रसिद्धी मिळवू शकतो. पण त्याचा उपयोग होणार नाही, असं भागवत यांनी सांगितलं.

Tags: hindu-muslimmohan bhagwatख्वाजा इफ्तिखार अहमदमोहन भागवतहिंदू-मुस्लिम
Previous Post

पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या

Next Post

सरसंघचालकांचं भाषण: यूपी निवडणुकीसाठी महत्वाचं! भाजपाला बेरीज शिकवणारं! जोडू पाहणारं!

Next Post
Mohan bhagwat

सरसंघचालकांचं भाषण: यूपी निवडणुकीसाठी महत्वाचं! भाजपाला बेरीज शिकवणारं! जोडू पाहणारं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!