मुक्तपीठ टीम
“हिंदू-मुस्लिम एक आहेत. याचं कारण आपली मायभूमी. पूजा करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. भाषा, प्रांत आणि इतर विषमता सोडून सर्व भारतीयांनी आता एक होण्याची आणि भारताला विश्वगुरू बनवण्याची वेळ आली आहे. भारत विश्वगुरू झाल्यावरच जग सुरक्षित होईल,” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
भागवतांनी कट्टरतावादी हिंदूंना नाकारले!
- गाय ही पूजनिय आहे.
- भारत हिंदू राष्ट्र आहे, परंतु लिंचिंग करणारे गुन्हेगार आहेत.
- आम्ही कधीच त्यांचे समर्थन करत नाही.
- जर हिंदू असे म्हणतात की एकही येथे मुस्लिमान राहू नये, तर तो हिंदू नाही. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण जे दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाविरोधात आहेत.
- अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली पाहिजे.
- राजकारणामुळे फुटिरतावाद निर्माण झाला आहे, तो हटवावा लागेल.
ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या पुस्तकाचे प्रकाशनामागे मतांचं राजकारण नाही!
- मोहन भागवत डॉ ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या ‘वैचारिक समन्वय-एक पहल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आले होते.
- डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद हे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहा राव यांचे सल्लागार होते.
- आपण या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आल्याने यामागे मतांचे राजकारण आहे, असं इतरांनी समजू नये.
- ते म्हणाले की पुस्तक न पाहताच मी त्याच्या प्रकाशनास होकार दिला आहे, कारण त्यात प्रामाणिकतेचं आवाहन आहे.
राजकारण हे स्वयंसेवकांचे कार्य नाही.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ राष्ट्रवादासाठी काम करतो.
- संघ जोडण्याचे काम करतो, तर राजकारण हे तोडण्याचे शस्त्र बनण्यात येते.
- केवळ राजकारणामुळे हिंदू-मुस्लिम एकत्र होऊ शकले नाहीत.
- संघ निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद वापरत असतो पण जे काही करतो ते देशाच्या हितासाठी करतो.
अल्पसंख्याकांच्या मनात भीती
- हिंदू-मुस्लीम वेगळे नाही तर एकच आहेत.
- हिंदू-मुस्लीम एकता ही एक भ्रामक कल्पना आहे.
- जेव्हा लोकं दोघांना वेगळं समजतात तेव्हा संकट उद्भवते.
- आपल्या श्रद्धेचा आकार आणि निराकार दोन्ही समान आहेत.
- आम्ही मातृभूमीशी प्रेम करतो. इथे राहणाऱ्या प्रत्येकाचं ती पालन पोषण करते.
देशाची वाढती लोकसंख्या ही भविष्यात धोका बनणार!
- काही लोक अल्पसंख्याक म्हणतात, आम्ही म्हणतो आम्ही सर्व एक आहोत.
- आम्ही हिंदू म्हणतो, तुम्ही भारतीय म्हणता.
- शब्दांच्या भानगडीत पडू नका.
- भारताला विश्वगुरू बनवायचे आहे.
- हिंदू संपवून टाकतील असं अल्पसंख्यांकांवर बिंबवलं जातंय.
- परंतु जेव्हा अल्पसंख्याकांवर बहुमताचा अत्याचार होतो तेव्हा बहुसंख्य लोकही त्याविरूद्ध आवाज उठवतात.
- आग लावणारा भाषण देऊन प्रसिद्धी मिळवू शकतो. पण त्याचा उपयोग होणार नाही, असं भागवत यांनी सांगितलं.