मुक्तपीठ टीम
निवासी मालमत्तांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या स्वरूपात महसूल संकलन ३५ टक्क्यांनी वाढून ९४८.४७ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राने मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या रूपात सर्वाधिक १८६ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ११३ अब्ज रुपयांपेक्षा ६५ टक्के अधिक आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश १२३.९४ अब्ज रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हे २०२१-२२ च्या याच कालावधीतील ९३ अब्ज रुपयांपेक्षा ३३ टक्के अधिक आहे.
११ राज्यांमध्ये ४०% वाढ
अहवालानुसार, या काळात ११ राज्यांच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या रूपात मिळणाऱ्या कमाईत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
या राज्याचा समावेश-
- महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय आणि मिझोराम. मिझोरामच्या महसुलात सर्वाधिक १०४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
- पुढील वर्षी रिअल इस्टेट उद्योगावर परिणाम होणार!!
- निवासी रिअल इस्टेट क्षेत्राने गेल्या १८-२४ महिन्यांत असाधारणपणे चांगली कामगिरी केली.
- येत्या तिमाहीत या क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- २०२३ मध्ये रिअल्टी उद्योगावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या!!
- देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच जानेवारी-सप्टेंबरमध्ये घरांच्या किमती सुमारे ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- निविष्ठ खर्चात झालेली वाढ आणि घरांची जोरदार मागणी यामुळे किंमती वाढल्या आहेत.
- प्रॉपर्टी ब्रोकरेज PropTiger.com च्या मते, सप्टेंबर तिमाहीपर्यंत या शहरांच्या प्राथमिक बाजारात निवासी मालमत्तांची सरासरी किंमत ६,६००-६,८०० रुपये प्रति चौरस फूट होती.
- २०२१ च्या डिसेंबर तिमाहीपर्यंत ते ६,३००-६,५०० रुपये प्रति चौरस फूट होते.