मुक्तपीठ टीम
पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील आयटी कर्मचारी विनोद जोशींच्या फास्टटॅग खात्यातून ३१० रुपये कापले गेले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची कार त्यांच्या घरीच होती. याचा पुरावा म्हणून काही सीसीटिव्ही फुटेज ही त्यांच्याजवळ उपलब्ध आहेत. फास्टॅगमधून पैसे उकळण्याच्या घटनेनंतर आता सायबर ठगांनी या प्रक्रियेद्वारे लोकांना लुटण्याचा मार्ग निवडल्याचे दिसून येत आहे.
विनोद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांना तीन अॅलर्ट्स एसएसएस त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झाले. त्यांच्या फास्टॅग खात्यातून एकूण ३१० रुपये कापले गेले आहेत, असे त्या एसएमएसमुळे त्यांच्या लक्षात आले. विनोदन जोशी यांनी डुप्लिकेट किंवा क्लोन केलेल्या फास्टॅगची शक्यता व्यक्त केली आहे.
दिवसभर घरातच कार उभी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज
जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी केवळ त्यांनी आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. ते पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाजवळ कोठेही गेले नाहीत. त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यात त्यांची कार दिवसभर घराजवळ उभी असल्याचे स्पष्ट करते.
कार घरीच पार्क, टोल भरल्याचे ३ एसएमएस!
पहिला एसएएमएस – वाशी टोल नाक्यावर त्याच्या खात्यातून ४० रुपये भरले
दुसरा एसएमएस – सकाळी ८:४० वाजता – खालापूर टोल नाक्यावर २०३ रुपये भरले
तिसरा एसएमएस – दुपारी १२:४०च्या सुमारास – तळेगाव टोल नाक्यावर ६७ रुपये भरले
बँकेने मदत नाकारली
जोशी ज्या बँकेत फास्टॅगचे खातं त्या बँकेत गेल्यावर त्यांना मदत करण्यास बँकेने नकार दिला.