Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता रॉयल एनफिल्ड 24X7 रोड साइड असिस्टेंस सर्व्हिस देणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
royal enfield

मुक्तपीठ टीम

रॉयल एनफिल्ड कंपनी आपल्या आकर्षक बाईक्स आणि फिचर्ससाठी नेहमीच चर्चेत असते. आताही असेच काहीसे घडले आहे. जर तुमच्याकडे रॉयल एनफिल्ड बाईक असेल किंवा नवीन रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती उपयोगी ठरू शकते. रॉयल एनफिल्डने अलीकडेच देशभरात आपली डिजिटल रोड साइड असिस्टेंस सर्व्हिस सुरू केली आहे. कंपनीच्या निवडक बाइक्सचे मालक या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतील. बुलेट, क्लासिक, मेटियर, इलेक्ट्रा, ६५० ट्विन्स आणि हिमालयनसारख्या बाइक्सच्या मालकांना रस्त्याच्या कडेला ही सर्व्हिस मिळू शकते.

रोड साइड असिस्टेंस सर्व्हिसचा लाभ कसा घ्यावा?

  • जर, रॉयल एनफिल्ड बाईक कुठेतरी बाहेर घेऊन गेल्यास आणि त्यात रस्त्यावर काही अडचणी किंवा बिघाड झाल्यास, रॉयल एनफिल्डकडून रस्त्याच्या कडेला मदतीसाठी विनंती करू शकता.
  • मदतीसाठी रॉयल एनफील्ड अॅप वापरावे लागेल.
  • विनंती केल्यानंतर, कंपनी त्या ठिकाणी मेकॅनिक पाठवेल.
  • जर तुमची बाईक खूप खराब असेल तर ती सर्व्हिस सेंटरमध्ये नेली जाईल आणि जर छोटी समस्या असेल तर मेकॅनिक तिथे बाइक दुरुस्त करेल.

घरी बसल्याही सर्व्हिसचा लाभ घेता येणार

ही सेवा घेतल्यानंतर दुचाकी मालकांना या सेवेचा लाभ केवळ बाहेर किंवा महामार्गावरच नाही तर घरी बसूनही घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेतल्यानंतर, बाईक मालकांना त्यांच्या बाइकची २ वेळा घरी बसून सर्व्हिसिंग करता येणार आहे.

रॉयल एनफिल्डने एका बाजूने सुरू केलेल्या या सर्व्हिसमुळे, सर्व कामगार शुल्क आणि प्रवास खर्च कंपनी उचलेल. मात्र, बाईकमध्ये नवीन पार्ट बसवल्यास त्याचा खर्च बाइकच्या मालकाला द्यावा लागणार आहे. जर नवीन रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी केली असेल तर ही सेवा कंपनीकडून मोफत दिली जाईल आणि जर बाईक ३ वर्ष जुनी असेल तर ८०० रुपये द्यावे लागतील आणि जर बाईक ५ वर्ष जुनी असेल तर, १ हजार रुपये भरावे लागतील.

पाहा व्हिडिओ:


Tags: 24X7 Roadside Assistance Service24X7 रोड साइड असिस्टेंस सर्व्हिसDigital servicegood newsLatest TechmuktpeethRoyal Enfieldचांगली बातमीडिजिटल सर्व्हिसमुक्तपीठरॉयल एनफिल्डलेटेस्ट टेक
Previous Post

ट्विटरचे नवे Co-Tweets फिचर… दोन यूजर्स एक ट्विट पोस्ट करण्यास सक्षम असणार

Next Post

पुणे महानगरपालिकेत ‘सहाय्यक विधी अधिकारी’ पदावर ४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
pmc

पुणे महानगरपालिकेत 'सहाय्यक विधी अधिकारी' पदावर ४ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!