मुक्तपीठ टीम
चेन्नईमध्ये पार पडलेल्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॉपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा समाना करावा लागला. दिल्लीने मुंबईचा ६ विकेटने दारुण पराभव केला. पराभवा व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मोठा फटका बसला आहे. रोहितला तब्बल १२ लाखांचा भारी भक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड स्लो ओवर रेटसाठी लावण्यात आला आहे. आयपीएलच्या या हंगामात प्रथम मुंबई इंडियन्स संघाला कोड ऑफ कंडक्टचे दोषी ठरविण्यात आले आहे.
काय आहे नियम…
- आयपीएलचे सामने २० ओवरचे असतात. हे २० ओवर संघांना ९० मिनिटात पूर्ण करावे लागतात.
- यापूर्वी २० वी ओवर ९० व्या मिनिटात सुरु करण्याचा नियम होता. पण आता कोणत्याही परिस्थिती ९० मिनिटात २० ओवर पूर्ण करण्याचा नियम लागू केला आहे.
- या ९० मिनिटात संघाला अडीच मिनिटांचे दोन टाइम आउटल दिले जातात.
- याचा अर्थ संघाला ८५ मिनिटात २० ओवर पूर्ण करायचे असतात.
- यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये १४.११ ओवर टाकणे आवश्यक असते.
मुंबई-दिल्लीच्या रोमांचक सामन्याबद्दल
- मुंबई इंडियन्सने दिल्ली समोर १३७ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावांमध्ये रोहित शर्माने ३० चेंडूत ४४ धावा केल्या. त्यांनी ३ चौके आणि ३ षटकार मारले. रोहित व्यतिरिक्त इशानने २६ धाव तर सूर्यकुमार यादवने २४ धावा केल्या.
- दरम्यान, दिल्लीने १९.१ ओवरमध्ये १३८ धावा करून सामना आपल्या नावे केला. यात शिखर धवन व्यतिरिक्त स्टीव स्मिथ यांनी २९ चेंडूत ३३ धाव केल्या.
चार सामन्यात दोन पराभव
- आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यातील दोन सामन्यात संघाला यश मिळाले, तर दोन सामन्यात पराभव झाला.
- रोहित शर्माला चेतावणी देण्यात आली आहे. जर या हंगामात दूसरी चूक निदर्शनात आल्यास २४ लाखांचा दंड आकारला जाऊ शकतो.
- तसेच स्लो ओवर रेटसाठी कर्णधारवर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार असणार आहे आणि ३० लाखांचा दंड आकारण्यात येईल.
२०१० नंतर पहिला विजय
- चैन्नईच्या मैदानावर दिल्लीने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यातील फक्त तीन सामने दिल्ली जिंकू शकली आहे.
- २०१० मध्ये दिल्लीने चेन्नईला ६ विकेट्सने हरवले होते.
- त्यानंतर चेन्नईच्या मैदानावर ७ सामने खेळले गेले, ज्यात काल झालेल्या सामन्यात पहिलांचा विजय दिल्लीने आपल्या नावे केला आहे.