मुक्तपीठ टीम
मुंबईत झालेल्या बीसीसीआय वार्षिक बोर्डाच्या बैठकीत रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते आता सौरव गांगुलीची जागा घेणार आहे. रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. रॉजर बिन्नी यापूर्वी बीसीसीआयच्या निवड समितीचेही एक भाग होते.
बीसीसीआयचे सर्व पदाधिकारांची बिनविरोध निवड…
- रॉजर बिन्नी यांनी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कोचिंगमध्ये त्यांचे करिअर बनवले होते.
- त्यांनी कोचिंगमधून भारताला दोन स्टार खेळाडूही दिले.
- २००० मध्ये युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या उपस्थितीत टीम इंडियाने अंडर-१९ विश्वचषक जिंकला तेव्हा रॉजर बिन्नी त्या संघाचे प्रशिक्षक होते.
- अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांच्याशिवाय राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी, जय शहा यांची सचिवपदी, आशिष शेलार यांची खजिनदारपदी, देवजित सैकिया यांची संयुक्त सचिवपदी आणि अरुण धुमाळ यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कोण आहे रॉजर बिन्नी?
- रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे भाग होते.
- ६७ वर्षीय रॉजर बिन्नी यांचा जन्म १९ जुलै १९५५ रोजी बंगळुरू येथे झाला.
- रॉजर बिन्नी हे टीम इंडियाचे पहिले अँग्लो इंडियन खेळाडू होते.
- १९८३ च्या विश्वचषकात त्यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.
- रॉजर बिन्नीने ८ सामन्यात ३३६ धावा देत १८ विकेट घेतल्या आहेत.
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रॉजर बिन्नीने ८ षटकांत २९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
- बिन्नी आणि मदन लाल या दोघांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ११८ धावांनी पराभव केला होता.
बीसीसीआयचे आतापर्यंतचे अध्यक्ष…
- १. आर.ई. ग्रँट गोवन
- २. सर सिकंदर हयात खान
- ३. सर हमीदुल्ला खान
- ४. सर के एस दिग्विजयसिंह
- ५. पी सुब्बारायन
- ६. अँथनी डी मेलो
- ७. जेसी मुखर्जी
- ८. महाराजकुमार विझियानाग्राम
- ९. सरदार सुरजित सिंग मजिठिया
- १०. आरके पटेल
- ११. एम. ए. चिदंबरम
- १२ महाराजा फतेहसिंहराव गायकवाड
- १३. झेड. आर. इराणी
- १४. एएन घोष
- १५. पी एम रुंगटा
- १६. रामप्रकाश मेहरा
- १७. एम चिन्नास्वामी
- १८. एसके वानखेडे
- १९. एनकेपी साळवे
- २०. एस श्रीराम
- २१. बीएन दत्ता
- २२. माधवराव सिंधिया
- २३. आय एस बिंद्रा
- २४. राज सिंग डुंगरपूर
- २५. एसी मुथिया
- २६. जगमोहन दालमिया
- २७. रणवीर सिंग महेंद्र
- २८. शरद पवार
- २९. शशांक मनोहर
- ३०. एन. श्रीनिवासन
- ३१. शिवलाल यादव
- ३२. जगमोहन दालमिया
- ३३. शशांक मनोहर
- ३४. अनुराग ठाकूर/ सीके खन्ना
- ३५. सौरव गांगुली
- ३६. रॉजर बिन्नी