Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रिकेटनं पसरवला कोरोना…रोड सेफ्टी वर्ल्ड सेरीजनंतर छत्तीसगडमध्ये संसर्ग वाढला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
road safety series

मुक्तपीठ टीम

छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यात आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कारणं शोधण्यासाठी केंद्र आणि राज्य संघ पोहोचले. जिल्ह्यातील कोरोना पसरण्यामागील कारण आणि त्यासंबंधीचे प्रयत्न करण्याबाबत टीमच्या सदस्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी रायपूरमध्ये आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट सामन्यात, मार्गदर्शक सूचनांमध्ये तसेच सार्वजनिक आयेजनांना दिलेली सूट यामुळे दुर्गमध्ये संक्रमणाचा वेग वाढल्याची माहिती सीएमएचओ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक येत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढल्याचंही सांगितलं गेलंय.

 

दिल्लीहून डॉ. एसके जैन, कोलकत्ताहून डॉ. अमित बारिक, रायपूरहून डॉ. सजल दे एम्स, नवी दिल्लीहून डॉ. संदीप एनसीडीसी यांचे पथक एका दिवसाच्या दौर्‍यावर दुर्ग येथे पोचले. सीएमएचओ डॉ. गंभीरसिंग ठाकूर यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत टीम सदस्यांनी बैठक घेतली. बैठकीत संघाच्या सदस्यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याची माहिती घेतली.

 

पथकाने दिलेले सल्ले खालीलप्रमाणे:

– जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचणी आणि लसीकरण वाढवावं.
– कॅन्टोनमेन्ट झोनमध्ये हालचाली करा.
– कॅन्टोनमेन्ट झोनमध्ये राहणाऱ्यांची १०० टक्के कोरोना तपासणी केली पाहिजे.

 

रोड सेफ्टी सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले जगातील सर्व दिग्गज खेळाडू खेळतात. ५ मार्च ते २१ मार्च या कालावधीत खेळल्या गेलेल्या या टी २० स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात असणाऱ्या इंडिया लीजेंडने श्रीलंकेच्या संघाचा पराभव करून विजेतेपद जिंकलं. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी होती.


Tags: कोरोनाक्रिकेटछत्तीसगडरोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज
Previous Post

हिमंत बिस्व सर्मा…आसाममधील लोकनेता…भविष्यातील अमित शाह?

Next Post

स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

Next Post
Stand Up India Scheme -2

स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!