मुक्तपीठ टीम
छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यात आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कारणं शोधण्यासाठी केंद्र आणि राज्य संघ पोहोचले. जिल्ह्यातील कोरोना पसरण्यामागील कारण आणि त्यासंबंधीचे प्रयत्न करण्याबाबत टीमच्या सदस्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी रायपूरमध्ये आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट सामन्यात, मार्गदर्शक सूचनांमध्ये तसेच सार्वजनिक आयेजनांना दिलेली सूट यामुळे दुर्गमध्ये संक्रमणाचा वेग वाढल्याची माहिती सीएमएचओ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक येत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढल्याचंही सांगितलं गेलंय.
दिल्लीहून डॉ. एसके जैन, कोलकत्ताहून डॉ. अमित बारिक, रायपूरहून डॉ. सजल दे एम्स, नवी दिल्लीहून डॉ. संदीप एनसीडीसी यांचे पथक एका दिवसाच्या दौर्यावर दुर्ग येथे पोचले. सीएमएचओ डॉ. गंभीरसिंग ठाकूर यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत टीम सदस्यांनी बैठक घेतली. बैठकीत संघाच्या सदस्यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याची माहिती घेतली.
पथकाने दिलेले सल्ले खालीलप्रमाणे:
– जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचणी आणि लसीकरण वाढवावं.
– कॅन्टोनमेन्ट झोनमध्ये हालचाली करा.
– कॅन्टोनमेन्ट झोनमध्ये राहणाऱ्यांची १०० टक्के कोरोना तपासणी केली पाहिजे.
रोड सेफ्टी सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले जगातील सर्व दिग्गज खेळाडू खेळतात. ५ मार्च ते २१ मार्च या कालावधीत खेळल्या गेलेल्या या टी २० स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात असणाऱ्या इंडिया लीजेंडने श्रीलंकेच्या संघाचा पराभव करून विजेतेपद जिंकलं. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी होती.