मुक्तपीठ टीम
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ मधील निम्म्याहून अधिक सामने झाले आहेत. यातील आतापर्यंत ११ सामाने पार पडले आहेत. या सीरिजमध्ये श्रीलंकेचा दिग्गज संघ ५ पैकी ४ सामने जिंकून १६ गुणांसह प्रथम स्थानावर आहे. त्याचबरोबर इंडिया लेजेंडचा संघ ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकून १२ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. तसेच सर्वात जास्त धावा करण्यामध्ये श्रीलंकेचा उपुल थरंगा प्रथम स्थानावर आहे. त्याने ३ सामन्यांत १७९ धावा केल्या आहेत. मात्र, क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरला पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवता आलेले नाही.
पहिल्या पाच खेळाडूंमध्ये कोण?
- उपुल थरंगा पहिल्या स्थानावर तर श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने ५ सामन्यांत ४२.७५ च्या सरासरीने १७१ धावा केल्या आहेत.
- तसेच या फलंदाजांमध्ये भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ सामन्यांत ८१.५० च्या सरासरीने १६३ धावा केल्या आहेत. सेहवागने दोन अर्धशतकेही केले आहेत.
- पहिल्या पाच खेळाडूंमध्ये वरिल खेळाडूंशिवाय इंग्लंडचा केव्हिन पीटरसन आणि इंडिया लेजेंडचा अष्टपैलू इरफान पठाण आहेत.
- पीटरसनने ३ सामन्यांत ४६ च्या सरासरीने १३८ धावा केल्या आहेत.
- पठाणने ४ सामन्यांत ११४ धावा केल्या आहेत.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ मध्ये सचिन तेंडुलकरला १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. सचिनने ४ सामन्यात २६ च्या सरासरीने केवळ ७८ धावा केल्या आहेत. तेंडुलकरपेक्षा जास्त धावा बांगलादेशच्या नाझीमुद्दीन (११५), ऑस्ट्रेलियाचा नाथन रीअर्डन (९६), इंग्लंडचा डॅरेन मॅडी (८६) आणि वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल (८२) यांनी केल्या आहेत.
दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा ठोकणारा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला पहिल्या दहामध्ये ही स्थान मिळवता आलेले नाही. तो ३ सामन्यात ७४ धावा करत ११ व्या स्थानावर आहे.
गोलंदाजांबद्दल
- गोलंदाज दिलशान आणि मुनाफ पटेलने ५ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.
- रंगाना हेराथच्या खात्यात ४ सामन्यांत ५ विकेट्स आहेत.
- भारताच्या प्रग्यान ओझाने ४ सामन्यात ४ विकेट, यूसुफ पठानने २ सामन्यात ४ विकेट मिळवल्या आहेत.