मुक्तपीठ टीम
बिहारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं गाजतोय. ज्यामध्ये एक महिला आयएएस अधिकारी एका विद्यार्थीने सॅनिटरी नॅपकिनबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अतिशय बेजबाबदारपणाने बोलत आहे. आज सॅनिटरी पॅड सरकारने द्या म्हणतायेत उद्या कंडोमही द्या म्हणाल, असं वादग्रस्त उत्तर या महिला अधिकारीनं दिलं. या महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक
- महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
- माझा प्रश्न चुकीचा नव्हता. ती काही मोठी गोष्ट नाही, मी विकत घेऊ शकते.
- पण बरेच लोक झोपडपट्टीत राहतात आणि त्यांना सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं परवडत नाहीत.
- म्हणून, मी फक्त माझ्यासाठी नाही तर सर्व मुलींसाठी तो प्रश्न विचारला होता.
कुमार विश्वास यांनी कौतुक केले-
यावर कवी कुमार विश्वास यांनी ट्विट करत रिया ला आशीर्वाद दिले आहे. ते म्हणाले की, असंचं प्रत्येक गर्विष्ठ राज्यकर्त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारत रहा. तुझ्या पिढीकडून हीच आशा आहे. मुली ज्यांचे कामचं प्रश्न विचारायचे होते. ते दुसऱ्यांवरच रोष दाखवण्यात व्यस्त आहेत.
वाढता वाद पाहून महिला अधिकारीने दिले स्पष्टीकरण-
- संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली असून हरजोत कौर यांना समन्स बजावण्यात आले आहे.
- दरम्यान, माझ्या बोलण्याने कोणत्याही मुलीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करते, असे स्पष्टीकरण या महिला आयएएस अधिकारीने दिले आहे.
- कोणाचाही अपमान करणे किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.