Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक दसरा, दोन मेळावे! शिवसेना शक्तिप्रदर्शनामुळे पोलिसांसमोर सुरक्षा आणि वाहतूक कोंडींचं आव्हान!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dussehra Melava; A Double Challenge Before The Mumbai Police

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मूळ शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ठ असतानाच दसरा मेळावा जवळ आला आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर एकाच दिवशी आणि एकाच वेळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनासाठी तयारी सुरु आहे. या दसऱ्या मेळाव्यात दोन्ही गटाकडून विक्रमी गर्दी होईल असा दावा करण्यात येत असल्याने पोलिसांसमोर दुहेरी आव्हान उभं राहिलं आहे. यादिवशी कायदा आणि सुरक्षा तसेच वाहतूककोंडी ही दोन मोठी आव्हाने पोलिसांपुढे आहेत.

दसऱ्याच्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी!!

  • यंदा शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आपणच मूळ शिवसेना असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १,४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.
  • राज्यातील खासगी बस चालक-मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथून मुंबईत येण्यासाठी खासगी बसगाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.
  • मुंबईत दसऱ्याच्या दिवशी, बुधवारी दुपारपर्यंत या गाड्या पोहोचतील, असे नियोजन आहे.
  • शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे.
  • त्यातच एकाच दिवशी हजारो बस मुंबईत दाखल होणार असल्याने दसऱ्याला प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.

पोलिसांसमोर दुहेर आव्हान!!

  • एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन्ही मेळावे आयोजित करण्यात आल्यामुळे पोलिसांना दोन्ही ठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.
  • या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी चाचपणी सुरू केली आहे.
  • बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याने नियमावलीप्रमाणे त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
  • तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिकही मेळाव्यासाठी एकत्र येणार असल्याने या ठिकाणीही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
  • स्थानिक पोलिस, सशस्त्र दलाचे पोलिस, एसआरपीएफ यांची आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार आहे.
  • मुंबई तसेच बाहेरून मेळाव्यासाठी येणारे कार्यकर्ते आणि त्यांची वाहने यामुळे कोंडी होऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणच्या आयोजकांना सूचना देण्यात आल्या आहे.
  • मेळाव्याच्या ठिकाणी येताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
  • यासाठी वेगवेगळ्या मार्गावर पोलिस तैनात ठेवण्यात येत

Tags: BKCDasara MelavaEknath Shindemumbaimumbai policeShivsenaShivteerthUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदसरा मेळावाबीकेसीमुंबईमुंबई पोलीसशिवतीर्थशिवसेना
Previous Post

भारतात पेट्रोल किंमत स्थिरच, पण इतर देशांनी किती कमी केले, किती वाढवले?

Next Post

सॅनिटरी नॅपकिनसाठी आयएएस अधिकारी महिलेच्या दुरुत्तरांशी सामना! बिहारच्या रियाकुमारीचं देशभर कौतुक!

Next Post
Riyakumari of Bihar is praised all over the country

सॅनिटरी नॅपकिनसाठी आयएएस अधिकारी महिलेच्या दुरुत्तरांशी सामना! बिहारच्या रियाकुमारीचं देशभर कौतुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!