मुक्तपीठ टीम
रिंगण हे संतविचारांचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक आहे. दरवर्षी एका संताविषयी समग्र माहिती एकत्र आणण्याचा प्रयत्न करणारं हे वार्षिक २०१२ पासून प्रत्येक आषाढी एकादशीला प्रकाशित होतंय. यंदा दहाव्या वर्षानिमित्त रिंगण काही प्रकल्प आयोजित करतंय, त्यातला एक म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. त्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन संपादक सचिन परब यांनी केलं आहे.
संतविचारांचा जागर तरुणांपर्यंत पोचण्यासाठी १९ डिसेंबरला माऊलींच्या आळंदीत ही राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा होतेय. त्याचे विषय, बक्षिसं, नियम, संपर्क आणि इतर माहिती सोबतच्या पोस्टरवर आहे. स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक असतील अशा मुलीमुलांपर्यंत, कीर्तनकारांपर्यंत, वारकरी शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोस्टर पोहचवण्यासाठी आपणही सहकार्य करावं. मुलांपर्यंत हे पोचवू शकतील अशा उत्साही शिक्षकांना, कॉलेजांना, ग्रुपना हे पोस्टर फॉरवर्ड करा, असे आवाहन रिंगणच्या वतीनं करण्यात आलं आहे.