Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुराणकाळात लुप्त झालेली सरस्वती नदी भारतात पुन्हा वाहणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Saraswati river

मुक्तपीठ टीम

प्राचीन काळातील वेदांमध्ये उल्लेख केली जाणरी विलुप्त सरस्वती नदी पुन्हा वाहती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भागात नदीच्या काठावर तलाव बांधले जातील. यासाठी अनेक पंचायतींनी जागेच्या ऑफरही दिल्या आहेत. एका वर्षात सरस्वती नदीचा उगम आदिब्रदी ते पिहोवापर्यंत २० मोठे जलाशय बांधण्याचे लक्ष्य आहे, जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साठेल आणि नदीत पाण्याचा प्रवाह सुनिश्चित होईल.

 

सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डाच्या योजनेंतर्गत रामपुरा हेरिया, रामपुरा कंबोयान, बोहाली, मछरौली, संगॉर, मुकूरपूर आणि स्योन्सर येथे जलाशय बांधले जातील. रामपुरा कंबोयान येथे ३५० एकर जागेवर मोठा जलाशय बांधला जाणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल. सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्ड जलसंचयांसाठी ग्रामपंचायतींकडून जमीन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. बर्‍याच पंचायतींनी संमतीही दिली आहे, जिथे जलाशय बांधण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल.

 

सरकारचे मुख्य लक्ष असे आहे की, आदिबद्री येथे धरण बांधावे, जे वर्ष २०२४-२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सरस्वती नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान होण्यासाठी हरयाणा आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर धरण बांधण्यासाठी या महिन्यात करार करण्यात येणार आहे. सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी या धरणाला निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.

 

सरस्वती नदीसाठी घेण्यात आलेले निर्णय

१. सरस्वती नदीच्या विकासासाठी शासनाने ३८८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
२. सरस्वती वारसा विकास मंडळाचे उपाध्यक्ष धुम्मनसिंह किरमच म्हणाले की, सरस्वतीमध्ये पाणी वाहण्यापूर्वी कचरा साफ करण्यासाठी मास्टर प्लॅनही तयार करण्यात आला आहे.
३. कुरुक्षेत्रातील पिपली ते गीतेचे मूळ ठिकाण ज्योतिसार पर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
४. याशिवाय शहाबाद ते इस्माइलाबादच्या जळबेडा पर्यंत मार्कंडाचे ओव्हरफ्लो पाणीदेखील साठवले जाईल.
५. यासाठी बीबीपूर तलावामध्ये मोठा जलाशय बांधण्याची योजना आहे.

 

रोडमॅपवर मुख्यमंत्र्यांचा शिक्का

सरस्वती वारसा विकास मंडळाचे उपाध्यक्ष धम्मनसिंग किरमच म्हणतात की, सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रोडमॅप तयार झाला आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री मनोहर यांची मान्यता मिळाली आहे. या योजनेंतर्गत आदिबाद्रीवर धरण बांधले जाणार असून सरस्वतीच्या काठावरही मोठे जलाशय बांधले जातील. पावसाळ्यात या जलाशयांमध्ये पाणी साचले जाईल आणि हे पाणी सरस्वतीला आवश्यकतेनुसार वाहते देखील ठेवेल. धरणाच्या बांधकामाबाबत हिमाचल सरकारबरोबर लवकरच करार केला जाईल. या दिशेने वेगाने काम केले जात आहे.

 


Tags: धम्मनसिंग किरमचमुख्यमंत्री मनोहररोडमॅपसरस्वती वारसा विकास मंडळहिमाचल सरकार
Previous Post

देशात स्वच्छ ऊर्जेसाठी ‘गेल’ करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक

Next Post

मुंबईच्या आयआयटीतील एम.टेक.च्या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत

Next Post
IIT

मुंबईच्या आयआयटीतील एम.टेक.च्या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!