Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या  मंत्रिमंडळ उपसमितीची उत्तर प्रदेशातील राम सुतार आर्ट कंपनीत आढावा बैठक  

May 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या  मंत्रिमंडळ उपसमितीची उत्तर प्रदेशातील राम सुतार आर्ट कंपनीत आढावा बैठक  

मुक्तपीठ टीम

मुंबई येथील इंदू मिल मध्ये उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळा निर्माणाचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी  नियुक्त  मंत्रिमंडळ  उपसमितीची आढावा बैठक  गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी येथे आयोजित करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंडे आणि सदस्य शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी गाझियाबाद येथे सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची  पाहणी  करून  बैठकीत  या सूचना केल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा  उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रतिकृतीची पाहणी केली. यावेळी पाहणीनंतर श्री. सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना प्रतिकृतीतील आवश्यक रेखीव बाबींविषयी काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार एमएमआरडीए, जे.जे स्कुल ऑफ आर्ट, आय.आय.टी.बॉम्बेतील तज्ज्ञ आणि स्मारक सल्लागारांच्या मार्गदर्शनाधारे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीत आवश्यक बदल करून मूळ पुतळ्याच्या कामाला सुरुवात करावी असे निर्देश श्री. मुंडे यांनी बैठकीत दिले. तसेच, यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक  ती सर्व प्रकारची मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी  सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंते  प्रकाश भांगरे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, शापुरजी पालनजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, शशी प्रभु अँड असोशिएट्सचे प्रकल्प सल्लागार अतुल कविटकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुंडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथे  नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर  स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस जानेवारी २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  यानुसार स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून ३५० फूट करण्यात आली.  पुतळा उभारण्यासाठी चवथरा निर्माणाचे कार्य सुरु असून याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गाझियाबाद येथील राम सुतार आर्ट कंपनीत पुतळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यात काही बदल सुचविण्यात आले आहेत. बदलाअंती उपसमितीच्या मंजुरीनंतर मूळ पुतळा निर्माण कार्यास सुरुवात होणार आहे. मार्च २०२४  पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे राज्य शासनाने उद्दिष्ट आहे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने ११०० कोटींच्या सुधारित निधीस मंजुरी दिली आहे. राज्यशासनाने मार्च २०२२ अखेर २२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून यातील २८ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे  भव्य स्मारक उभारण्यास राज्य शासन कटिबध्द असून डॉ.बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट्य आहे. देश- विदेशातील डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून प्रेरणा घेतील, असा विश्वासही उभय मंत्रिमहोदयांनी यावेळी व्यक्त केला.


Tags: Appointed Cabinet Sub-CommitteeBharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar MemorialMinister Dhananjay MundemuktpeethMumbai Indu MillRam Sutar Art CompanyReview Meetingआढावा बैठकनियुक्त  मंत्रिमंडळ  उपसमितीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरमंत्री धनंजय मुंडेमुक्तपीठमुंबई इंदू मिलराम सुतार आर्ट कंपनी
Previous Post

दौरा स्थगित झाल्यावर संजय राऊत अयोध्येत राज ठाकरेंना सहकार्यसाठी तयार!

Next Post

नव्वद कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार शशांक वैदयला अटक

Next Post
GST scam

नव्वद कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार शशांक वैदयला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!