Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कलाकारांसाठी चांगली बातमी! ‘कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदत’ योजना!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
ministry of culture

मुक्तपीठ टीम

आपल्या उमेदीच्या काळाच रसिकांची मनं जिंकत धनवानही होणारे कलाकार अनेकदा उतारवयात मात्र उपेक्षेच्या गर्तेत फेकले जातात. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकरांसारखी त्यांची अवस्था होते. आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची नवी योजना अशा कलाकारांसाठी चांगली बातमी ठरू शकेल. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदत’ योजना सुरु केली आहे.

 

कशी असणार योजना, कशी होणार कलाकारांना मदत?

  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘कलाकारांसाठी निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय मदत’ योजना नावाची एक नवी योजना सुरु केली आहे.
  • विशिष्ट कला आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या पण सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठणाऱ्या वयोवृद्ध कलाकार आणि गुणवंतांच्या आर्थिक तसेच सामाजिक-अर्थविषयक परिस्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • ज्या कलाकारांचे (व्यावसायिक तसेच बिगर-व्यावसायिक अथवा हौशी) वय ६० हून अधिक आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४८,००० रुपयांहून कमी आहे अशा पात्र लाभार्थ्यांना या योजनेतून निधी दिला जातो.
  • त्याशिवाय संस्कृती मंत्रालय ‘कला आणि संस्कृती संवर्धनासाठी शिष्यवृत्ती तसेच फेलोशिप’ योजना देखील राबवीत आहे.

 

कलाकार निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय मदत योजनेचे मुख्य घटक

  • विविध कला क्षेत्रातील युवा कलाकारांसाठी शिष्यवृत्ती (एसवायए) :- वय वर्षे १८ ते २५ या गटातील तरुण कलाकार लाभार्थ्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी चार समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये दर महिना ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उमेदवाराने किमान पाच वर्षे गुरूंच्या अथवा एखाद्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेले असले पाहिजे. मंत्रालयाने सुरु केलेल्या या शिष्यवृत्तीसाठी तज्ञ समितीसमोर केलेले सादरीकरण, व्यक्तिगत मुलाखत आणि चर्चा यांच्या आधारावर गुणवंत उमेदवारांची निवड करण्यात येते.
  • विविध कला क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ज्येष्ठ/ कनिष्ठ फेलोशिप- कला क्षेत्रातील संशोधनासाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या कलाकारांना चार समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये दर महिना 20,000 रुपये अशी दोन वर्षांसाठी ज्येष्ठ फेलोशिप देण्यात येते. तर 25 ते 40 वर्षे या वयोगटातील निवडक कलाकारांना चार समान अर्धवार्षिक हप्त्यांमध्ये दोन वर्षांसाठी दर महिना 10,000 रुपयांची कनिष्ठ फेलोशिप देण्यात येते. प्रत्येक वर्षीच्या तुकडीत सुमारे 400 ज्येष्ठ आणि कनिष्ठ फेलोशिप देण्यात येतात. ज्येष्ठ आणि कनिष्ठ फेलोशिपसाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नेमलेल्या तज्ञ समितीकडून या फेलोशिप साठी पात्र कलाकारांची निवड करण्यात येते.
  • कला क्षेत्रातील संशोधनासाठी टागोर राष्ट्रीय फेलोशिप – या फेलोशिपसाठी दोन विभागांत कलाकारांची निवड करण्यात येते, टागोर राष्ट्रीय फेलोशिप आणि टागोर संशोधन शिष्यवृत्ती. यासाठी चार विविध गटांतील अनेक सहभागी संस्थांच्या संलग्नतेच्या माध्यमातून कलाविषयक संशोधनाचे कार्य करण्यात येते. मंत्रालयाने या कार्यासाठी विशेषत्वाने निवड केलेल्या राष्ट्रीय निवड समितीकडून या दोन योजनांसाठी कलाकारांची अंतिम निवड करण्यात येते.
    वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्तींखेरीज रेपर्टरी अनुदान, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठीचे अनुदान अशा इतर योजनांच्या माध्यमातून व्यावसयिक आणि हौशी कलाकारांना आर्थिक मदत करण्यात येते.

केंद्रीय संस्कृती, पर्यटन तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.


Tags: art fieldArtist Retirement Salary and Medical Assistance Schemecelebritiesgood newsmuktpeethRetirement and medical aid plansUnion Ministry of Cultureकला क्षेत्रकलाकार निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय मदत योजनाकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्थाचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

माघी गणेशोत्सव: दीड दिवसात बाप्पा चालले गावाला…

Next Post

मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट!

Next Post
Practice paper for class 10 And 12 students by education department

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी शिक्षण खात्याची प्रश्नपेढी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!