मुक्तपीठ टीम
आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बाप्पाच्या आगमनाचं वेध हे साऱ्यांच लागलं आहे. मात्र कोरोनाचा काळ आहे, तिसऱ्या लाटेचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने काही राज्यांसाठी निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्र सरकारने आधीच लोकांना गणेशोत्सव दरम्यान संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातून कोरोनाची प्रकरण वाढत आहे. येथील सरकारने गणेशोत्सवातील मिरवणुकीवर बंदी घातली आहे. यासोबतच रात्रीचा कर्फ्यूही जाहीर करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातही अशीच परिस्थिती आहे.
कर्नाटक
- सरकारने ५ दिवसांच्या गणेश चतुर्थी उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणुका आणि मूर्ती विसर्जनावर कडक बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
- बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात रात्री ९ नंतर रात्रीचा कर्फ्यू लावला आहे.
- सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, गणेशोत्सव आणि विसर्जनासाठी २० पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.
- रात्री ९ नंतर रात्रीचा संचारबंदी लागू राहील.
- मार्गदर्शक सूचनांनुसार, केवळ पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना परवानगी असेल.
- गणेश चतुर्थी उत्सवाच्या वेळी अन्न आणि प्रसादाचे वितरण करण्यास परवानगी नाही.
- २% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोणतेही उत्सव होणार नाही.
महाराष्ट्र
- गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण या वेळीही हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून साजरा केला जाणार आहे.
- विशेषतः मुंबई मनपाने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई मनपाने केवळ ५१९ मंडळांना परवानगी दिली आहे.
- १,२७३ मंडळांनी नागरी संस्थेकडे परवानगीसाठी संपर्क साधला होता, तर ३,००० हून अधिक मंडळांनी मनपाकडे परवानगीसाठी अर्ज केला होता.
आंध्र प्रदेश
- सरकारने मंडपाला परवानगी दिलेली नाही.
- तसेच मूर्ती विसर्जन मिरवणुकांना परवानगी दिली जाणार नाही.
- यामुळे मूर्तिकार दु: खी झाले आहेत.
- त्यांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी कोरोनाने त्यांचे नुकसान झाले होते आणि या वर्षीही सरकारने कडक नियम केले आहेत.