Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ममता बॅनर्जींसाठी मार्ग मोकळा! पण आता भाजपाचा निवडणूक आयोगाविरोधात आक्षेप का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mamata banerjee

मुक्तपीठ टीम

बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्रीपदी विनाव्यत्यय कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांना त्यांच्या सुरक्षित मतदारसंघातून निवडून येण्याची औपचारिकताच पूर्ण करावी लागेल. अर्थात भाजपाकडून टोकाचा विरोध होणार असला तरी सध्या भाजपाला गळती लागून तृणमूल काँग्रेस प्रवेशाची जी लाट उसळली आहे ती पाहता ममतांना विजय अवघड नसणार. बहुधा त्यामुळेच भाजपाने आता ममतांची निवडून येण्याची मर्यादा संपण्यापूर्वी निवडणूक घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या घोषणेवरच आक्षेप घेतला आहे.

बंगालमध्ये कोणत्या निवडणुका?

  • ममता बॅनर्जींनी स्वत:च्या पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले असले तरी त्यांचा तृणमूलचे फुटीर भाजपाचे उमेदवार शुभेंदु अधिकारींकडून पराभव झाला.
  • त्यामुळे ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी सहा महिन्यात विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे.
  • बंगालात सात जागा रिकाम्या असूनही आयोग निवडणुका घोषित करत नसल्याने तृणमूल नेत्यांनी दिल्लीत आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली.
  • निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधल्या भवानीपूर, समशेरगंज आणि जंगीपूरमधल्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.
  • निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव एच. के.द्विवेदी यांच्या भूमिकेवरच भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
  • पश्चिम बंगालमध्ये ७ जागा रिक्त असूनही कोरोना आणि सणासुदीचे दिवस पाहता ३ जागांवरच्याच पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
  • त्यात भवानीपूरचाही समावेश करण्यात आला आहे.
  • याठिकाणी ३० सप्टेंबरला मतदान आणि ३ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.

काय आहे भाजपचा आक्षेप?

  • पूर्वाश्रमीचे ममता बॅनर्जींचे जवळचे सहकारी आणि भाजप नेता शुभेंदु अधिकारी यांनी मुख्य सचिवांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
  • देशातल्या ३१ विधानसभा क्षेत्रातल्या पोटनिवडणुका का घेतल्या जात नाही आहेत, यावर निवडणूक आयोग स्पष्टीकरण देणार का?
  • राज्याचे मुख्य सचिव हरे कृष्णा द्विवेदींनी आयोगाला भवानीपूरमध्ये पोटनिवडणुका न झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, असं कळवलं आहे, मात्र ते असं सांगू शकत नाहीत.
  • इतर ठिकाणी पोटनिवडणुका होत नाहीयत, हा गंभीर मुद्दा आहे.

काय आहे मुख्य सचिवांचं म्हणणं?

  • संविधानाच्या अनुच्छेद १६४(४)चा संदर्भ देण्यात आला आहे.
  • घटनेच्या तरतुदीनुसार विधीमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला ६ महिने घटनात्मक पदावर राहता येतं.
  • ६ महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी निवडणून येणं बंधनकारक आहे.
  • प्रशासकीय गरजा आणि जनहित पाहता निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

 

काय आहे अधिसूचना?

  • मुख्य सचिवांच्या भूमिकेनंतर निवडणूक आयोगाने इतर ३१ विधानसभा आणि ३ संसदीय क्षेत्रांमध्ये पोटनिवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • घटनात्मक बाबींचा विचार करता भवानीपूरसह तीन मतदारसंघातच पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हणतेय तृणमूल काँग्रेस?

  • तृणमूलचे युवा नेता देबांशु भट्टाचार्य यांनी सांगितलंय की, आम्हाला सर्व जागांवर निवडणुका हव्या आहेत.
  • मात्र निवडणूक आयोगाने भवानीपूरमध्ये निवडणुकीचा निर्णय घेतला आहे.
  • निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. ते त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेतात.
  • तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगावर कसं वर्चस्व प्रस्थापित करेल?
  • आमची यात कोणतीही भूमिका नाही.
  • ज्याठिकाणी निवडणुका होणार, तिथे आम्ही विजयी पताका फडकावणार.

भवानीपूरमध्ये संपूर्ण ताकदीनिशी भाजप उतरणार

  • विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केल्यानंतर आता भवानीपूरमध्येही ममतांच्या पराभवाचा भाजपाचा प्रयत्न असेल.
  • भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवारीसाठी भाजपकडून चाचपणी सुरु झाली आहे.
  • यात प्रामुख्याने ४ नावं चर्चेत आहेत.
  • त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत राय, श्यामाप्रसाद मुखर्जी फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. अनिर्बाण गांगुली, अभिनेता रुद्रनील घोष आणि महिला उमेदवार म्हणून माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांची नावं चर्चेत आहेत.

Tags: BJPMamata Banerjeetrunmul congressतृणमूल काँग्रेसममता बॅनर्जीश्यामाप्रसाद मुखर्जी फाऊंडेशन
Previous Post

बैल पोळ्याच्या निमित्तानं…सुपभर गहू मागावे लागतील…

Next Post

गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न…विघ्न दूर करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये निर्बंध!

Next Post
Ganesh Festival

गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न...विघ्न दूर करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये निर्बंध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!