मुक्तपीठ टीम
आताच्या काळामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या अॅपची गरज भासते. त्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनसुद्धा गरजेचा असतो. परंतू आता स्मार्टफोन आणि इंटरनेटविना पेमेंटच्या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फिचरफोन वापरणाऱ्यांसाठी यूपीआयचा वापर करण्याचा सुविधेचा शुभारंभ केला. एका समारंभात त्यांनी फिचर फोनसाठी यूपीआय लाँच करण्याची घोषणा केली.
फिचर फोनबाबत माहिती
- फिचर फोन हे स्मार्टफोन सारखे नसतात, केवळ कॉल करण्यासाठी आणि टेक्स्ट मॅसेज पाठवण्यासाठी वापरले जातात.
- परंतू फिचर फोनचा वापर डिजिटल पेमेंटसाठीसुद्धा केला जाणार आहे.
- आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंटची टेक्निक अतिशय महत्वपूर्ण आहे.
- फिचर फोन यूजर्स एसएमएसच्या माध्यमातून वापर करू शकतील आणि त्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज भासणार नाही.
भारतात सरासरी ११८ कोटी यूजर्स मोबाइल फोन वापरत आहे. यात मोठ्या संख्येने यूजर्स अद्याप फिचर फोनचा वापर करत आहे. स्टेटिस्टाच्या माहितीनुसार, जुलै २०२१च्या अहवालानुसार ७४ कोटी यूजर्सजवळ स्मार्टफोन आहेत. याचा अर्थ आजही ४४ कोटी यूजर्स फिचर्स फोन वापरतात.
याआगोदर विशेष रूपात *९९# सेवा सर्व मोबाइल यूजर्ससाठी सुरू करण्यात आली होती,कोणत्याही फोनमध्ये स्मार्टफोन किंवा फिचर फोन या दोन्हींमध्ये या सुविधेचा लाभ सर्वांना घेता येत होता.
सोबतच यूपीआय व्यवहार करण्यासाठी फोन नंबर आपल्या खात्याशी जोडलेला असणे गरजेचे आहे. नाहितर व्यवहार करता येणार नाही.