Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिक्स आणि मॅच लसीकरण हा कोरोनावर प्रभावी उपाय!

द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाला अभ्यास

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
vaccine

मुक्तपीठ टीम

जगाची दोन वर्षे कोंडी करणारी कोरोना महामारी आता भारतात पुन्हा काही प्रमाणात डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळे काहीशी भीती निर्माण होत आहे. संशोधकांनी अभ्यासानंतर कोरोनाला रोखण्यासाठी मिक्स आणि मॅच लसीकरण हा प्रभावी तोडगा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी कोरोनाविरुद्ध संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग लसीकरणच असल्याचा दावा केला आहे. द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, जर लोकांना मिक्स आणि मॅच लसीचा बूस्टर शॉट दिला गेला तर ते कोरोनापासून अधिक सुरक्षित राहू शकतात. मिक्स आणि मॅच लसीकरण म्हणजे तुम्हाला पहिल्या दोन डोसमध्ये मिळालेल्या लसीव्यतिरिक्त इतर लसीचा बूस्टर डोस देणे.

बूस्टर डोसमुळे अतिरिक्त संरक्षण मिळणार

  • अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, लसीच्या दोन डोसच्या तुलनेत तिसरा किंवा बूस्टर डोस दिल्यास, ते अतिरिक्त संरक्षण प्रदान करू शकते.
  • त्याच वेळी, संशोधनात असे आढळून आले आहे की ते अधिक प्रभावी करण्यासाठी मिक्स आणि मॅच लसीकरण वापरणे प्रभावी ठरू शकते.

अभ्यासात काय आढळले?

चिलीच्या विद्यापीठांच्या सहकार्याने चिलीच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून, मिक्स आणि मॅच लस बूस्टर शॉटच्या परिणामकारकता समजते. या संशोधनासाठी, ११ ,१७४,२५७ लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी ४१ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाव्हॅक लसीचे दोन डोस मिळाले आहेत.

मिक्स आणि मॅच बूस्टर शॉट गंभीर प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त

  • वेगवेगळ्या लसींच्या बूस्टर शॉट्सच्या परिणामकारकतेच्या या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या लोकांना कोरोनाव्हॅकचा तिसरा डोस देण्यात आला होता, त्यांच्यामध्ये कोरोना लक्षणे रोखण्याची परिणामकारकता जवळपास ७९ टक्के आढळून आली.
  • ज्यांना अॅस्ट्राझेनेका बूस्टर शॉट दिला आहे ते ९३ टक्के सुरक्षित असल्याचे आढळले, तर ज्यांना फायझर बूस्टर शॉट दिले ते ९७ टक्के सुरक्षित असल्याचे आढळले.
  • या आधारावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बूस्टर शॉटमध्ये वेगळ्या कंपनीची लस दिल्यास लोकांच्या आजारावर परिणामकारकता वाढू शकते.

बूस्टर शॉटवर भर

बूस्टर शॉटसाठी मिक्स-अँड-मॅच लस प्रणाली वापरणे, कोरोनामुळे हॉस्पिटलायझेशन, व्हेंटिलेटर वापरणे आणि मृत्यूचे धोके लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की, अनेक अभ्यासांवरून असे दिसून येते की लसीच्या दोन डोसपासून बनवलेली रोगप्रतिकारक शक्ती काही काळानंतर कमी होऊ लागते, अशा परिस्थितीत ही पद्धत खूप उपयुक्त ठरू शकते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Booster Dosecoronavirus treatmentgood newshealthMinistry of HealthMix and match vaccinationmuktpeethResearchersThe Lancet Global Health Journalआरोग्यआरोग्य मंत्रालयकोरोनाकोरोनावर इलाजचांगली बातमीद लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलबूस्टर डोसमिक्स आणि मॅच लसीकरणमुक्तपीठसंशोधक
Previous Post

देशभरातील कला कौशल्याची मुंबईत बहरलेली ‘हुनर हाट’ जत्रा, मनात ठसा उमटवणारी!

Next Post

टीव्ही अभिनेत्रीची प्रेरणा कथा…कर्करोग बाधा ऐन तारुण्यात, हसत-हसत केली मात!

Next Post
Actress Chhavi Mittal

टीव्ही अभिनेत्रीची प्रेरणा कथा...कर्करोग बाधा ऐन तारुण्यात, हसत-हसत केली मात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!