मुक्तपीठ टीम
संसर्गापासून सुरक्षित ठेवणाऱ्या ढालीचे काम करणाऱ्या एका पिशवीच्या शोधाची चांगली बातमी आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्य रक्षकांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होणार आहे.
कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्यांनाही दररोज विविध धोक्यांचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेत वैज्ञानिकांनी एक शोध लावला आहे. ज्यामुळे आरोग्य कर्मचार्यांच्या आरोग्याचा धोका कमी होईल. चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी एक पिशवी तयार केली आहे. ज्यामुळे कचरा गोळा करताना संक्रमणाचा उच्च धोका थोपवता येईल. संसर्गावर नियंत्रण राखता येईल. ही पिशवी दुय्यम संसर्गाचा फैलाव रोखेल. कोरोनाबरोबरच क्षयरोग आणि इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी हे उपयुक्त ठरेल.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी ही स्वायत्त संस्था आहे. तिच्या संशोधकांनी बनविलेली ही पिशवी श्वासोच्छवासातील स्त्रावाची सुरक्षित विल्हेवाट लावते. ही पिशवी प्रभावी जंतुनाशकांसह अति-शोषक सामग्रीची बनलेली आहे. या पिशवीचे नाव आहे “अॅक्रिलॉरब ” असे आहे.
जेव्हा रुग्णास रुग्णालयात दाखल केले जाते, तेव्हा स्राव व्हॅक्यूम लाइन वापरुन बाटल्या किंवा डब्यात टाकला जातो आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेनंतर तो द्रव सोडला जातो. विल्हेवाट लावण्यादरम्यान यास संक्रमणाचा उच्च धोका असतो
ही पिशवी ५०० मिलीलीटर संक्रमक स्राव आत्मसात करू शकते. तसेच, जंतुनाशकामुळे लवकरच संपूर्ण यंत्रणा निर्जंतुकीकरण होईल. लाइनर स्ट्रक्चरमध्ये पेटंट डिझाइन आहे, जे प्रगतीशील शोषक उपलब्धता वरच्या बाजूस नेण्यास अनुमती देते. या पिशव्यांमध्ये साठवून ठेवणारे (त्वरित) आणि त्वरित निर्जंतुकीकरणारे घटक असतात, हे एरोसोल तयार होण्यापासून रोखून दुय्यम संसर्ग होण्याचा धोका दूर करते. हे आरोग्य कर्मचार्यांना संसर्गापासून प्रतिबंधित करते आणि अशा प्रकारे व्यवस्थापन सुरक्षित पद्धतीने करते. ही पिशवी अनुकूल सीलर पिशवीमध्ये बंद होते. या पिशवीची चाचणी ही घेण्यात आली आहे.
एससीटीआयएमएसटीच्या टीममध्ये बायो-मटेरियलचे वैज्ञानिक आणि डॉ. मंजू, डॉ. मनोज कोमथ, डॉ. आशा किशोर, डॉ. अजय प्रसाद ऋषि अशा डॉक्टरांचा समावेश आहे. अॅक्रिलॉरब सक्शन कॅनिस्टर लाइनर पिशवीची माहिती रोम्ससन साइंटिफिक अॅण्ड सर्जिकल प्रायव्हेट लिमिटेडला उत्पादन व त्वरित विपणनासाठी हस्तांतरित केली गेली आहे. प्रत्येक कॅनिस्टर लाइनर पिशवीची किंमत सुमारे १०० रुपये आहे.
पाहा व्हिडीओ: