Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कालबद्ध वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी हाफकीनमध्ये प्रकल्प प्रमुखाची नेमणूक करा”

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची मागणी

March 17, 2021
in सरकारी बातम्या
0
amit deshmukh

मुक्तपीठ टीम

        हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेमध्ये सध्या विविध प्रकल्पांवर संशोधन आणि चाचणीचे काम सुरु आहे. ही सर्व कामे कालबद्ध वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुखांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

 

            हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी  संस्थेची 59 वी नियामक परिषदेची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह हाफकिन संस्थेच्या संचालिका सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह हाफकिन संस्थेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

            वैद्यकीय शिक्षण मंत्री  देशमुख म्हणाले की, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या प्रगती अहवालाबाबत कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. ही कार्यवाही कालबद्ध वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुख नेमण्यात यावा. याशिवाय हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्रपणे येऊन काम करणे आवश्यक आहे. हाफकिन येथे सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्याबरोबरच प्रस्तावित औषधांची चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याला गती देण्यात यावी. हाफकिन संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि पीएच.डी करण्यासाठीही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात यावे, असेही  देशमुख यांनी सांगितले.

 

             देशमुख म्हणाले की, हाफकिन संस्थेसाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांमार्फत लवकरच एमडी पॅथॉलॉजिस्टची नेमणूक करण्यात येईल. तसेच हाफकिन संस्थेने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांना नियामक परिषदेने मंजुरी दिली आहे. याशिवाय या संस्थेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि अधीक्षक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाफकिन संस्थेतील एकूण 14 निवासी/ अनिवासी इमारतींच्या सुरु असलेल्या दुरुस्ती कामांना गती देण्यात येणार असल्याचे  देशमुख यांनी सांगितले.


Tags: डॉ. रघुनाथ माशेलकरशिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.संशोधन व चाचणी संस्था
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र

Next Post

“महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे”

Next Post
nilam gore

"महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!