मुक्तपीठ टीम
देशात कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपी कोरोना उपाचाराच्या यादीतून केंद्र सरकारने वगळली आहे. त्यानंतर आता कोरोना उपचारात सर्वात जास्त मागणी आणि वरदान ठरलेले रेमडेसिविर इंजेक्शनही उपचाराच्या यादीतून वगळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शनचा परिणाम होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
रेमडेसिविरसह इतरही प्रायोगिक उपचार बंद होणार?
- रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोना रुग्णावर काही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
- त्यामुळे रेमडेसिविर उपचाराच्या यादीतून वगळण्याची मागणी होत आहे.
- प्लाझ्मा थेरपीनंतर कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रायोगिक उपचारांना तसंच औषधांना यादीतून वगळले जाऊ शकते.
- त्यांच्या वापरामुळे करोना रुग्णावर कोणत्याही प्रकारचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे पुरावे नाहीत.
- जी औषधं परिणामकारक ठरत आहेत, त्यांच्या योग्य परीक्षणानंतर तीच कोरोना उपचार यादीत राहतील.