मुक्तपीठ टीम
माळ घालून स्वतःला हभप महाराज म्हणवणाऱ्या चिकणकर बुवाचा पत्नीला लाथाबुक्क्यांनी तसेच प्लास्टिकच्या बादलीने अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्यानंतर संताप व्यक्त होऊ लागताच पोलीस पोहचण्यापूर्वीच हा बुवा आळंदीला पसार झाला आहे. कल्याण तालुक्यातील व्दारली या गावात राहणारा गजानन चिकनकर हाच लोकांना ब्रगह्मज्ञान सांगण्याचा आव आणताना स्वत: मात्र क्रूर पाषाणच राहिलेला बुवा आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसेनेच्या महिला आघाडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण मारहाणीच्या प्रकाराबद्दल इतर कुटुंबीयांना जाब विचारला. तो पहिल्या पत्नीला मारहाण करत असताना तिच्या मदतीला कुणी का धावलं नाही, असा जाबही विचारला.
चिकणकरांचे पाषाणी कारनामे नातवामुळे व्हायरल
• गावागावात जाऊन कीर्तनाचे धडे देणारे गजानन चिकनकर यांनी आपल्या पत्नीला जबर मारहाण केली आहे.
• त्याच्यासोबत दोन पत्नी, मुले, सुना, नातवंड असे सर्वजण राहत असतात.
• ते भक्तांना ब्रह्मज्ञानाचे धडे देत असतो.
• मात्र, पहिली पत्नी वयस्कर असल्यानं त्या काम करत नसल्यानं तो अनेकदा पत्नीला मारहाण करतो.
• हा व्हिडीओ त्यांच्या नातवानेच रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे.
व्हिडीओत क्रूर पाषणासारखी मारहाण
• ते आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असताना आजबाजूला इतरही अनेक महिला आहेत, मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला धावलं नाही.
• चिकणकर महिलेला परत असं करशील का? असे धमकावत वारंवार मारहाण करत आहेत.
• यामध्ये अगदी लाथाबुक्क्यानी प्लास्टिकची बादलीने अमानुष मारहाण करताना दिसत आहे
• इतक्यावरच चिकणकर थांबले नाही तर त्यानं महिलेला हाताला धरुन ओढत भिंतीवर आदळलं आणि तिला घरातून बाहेर काढण्यासाठी ते ओढत असल्याचंही यात दिसत आहे.
• यात तिच्या हातालाही दुखापत झाली आहे.