मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो लवकरच एक बजेट लॅपटॉप लॉंच करणार आहे. या लॅपटॉपचे नाव ‘जियोबुक लॅपटॉप’ असणार आहे. भारतीय बाजारात सध्या शाओमी, रिअलमी आणि इनफिनीक्स या कंपन्यांचे सर्वात स्वस्त लॅपटॉप उपलब्ध आहेत. पण, असे म्हटले जात आहे की, ज्याप्रमाणे जियोने आपले स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करून इतर टेलिकॉम कंपन्यांना अडचणीत आणले आहे, त्याचप्रमाणे ही कंपनी आपला स्वस्त लॅपटॉप सादर करून इतर कंपन्यांचे मार्केट थंड करू शकते.
‘जियोबुक लॅपटॉप’चे कसे असणार फिचर्स?
- रिलायन्सचा ‘जियोबुक लॅपटॉप’ कंपनीच्या जियो ओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
- त्याचे अॅप्स जियो स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.
- जियोच्या या लॅपटॉपला १३६६ x ७६८ पिक्सेल डिस्प्ले सपोर्ट मिळेल.
- हा लॅपटॉप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर सपोर्टसह येईल.
- जियोच्या स्वस्त लॅपटॉपला ४जीबी रॅम आणि ६४ जीबी ईएमएमसी स्टोअरेज सपोर्ट मिळेल.
- हा लॅपटॉप स्वस्त असूनही, या लॅपटॉपमध्ये एक उत्कृष्ट मल्टीटास्किंग एक्सपिरियन्स असल्याचे म्हटले जाते.
‘जियोबुक लॅपटॉप’ची किती किंमत असणार?
- जियो बुकची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे, जी मिड-बजेट अॅंड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा कमी आहे.
- मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जियोने स्वस्त लॅपटॉपसाठी क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट या
- जागतिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
- जियो लॅपटॉप ४जीची क्षमता असलेल्या सिम कार्डसह येईल. यासाठी कंपनीने संगणक चिप आधारित तंत्रज्ञान कंपनीशी हातमिळवणी केली आहे, जी विंडोज ओएस सपोर्ट अॅपसह येईल.
रिलायन्स जियो देशभरात परवडणाऱ्या दरात ४जी सेवा देत आहे. जियोचे भारतात जवळपास ४२ कोटी यूजर्स आहेत. जियो या युजरबेसवर लक्ष केंद्रित करत आहे. भारतात एचपी, डेल, लेनोव्हो लॅपटॉप शिपमेंटमध्ये आघाडीवर आहेत.