Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ई-श्रम पोर्टलवर ६ कोटी कामगारांची नोंदणी! असंघटित कामगारांसाठी मोठी सुरक्षा आणि सुविधा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
muktpeeth

मुक्तपीठ टीम

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी बनवण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत ६ कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. कामगार मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका ट्वीटमध्ये ही माहिती दिली आहे. कामगार मंत्रालयाच्या ट्वीटनुसार, ई-श्रम पोर्टलवर ६ कोटी नोंदणी पूर्ण झाली आहे.

 

ई-श्रम पोर्टल नोंदणीचा कामगारांना फायदा

  • असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे.
  • स्थलांतरितांसह असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करु शकतात.
  • हे कामगार अनेक सामाजिक सुरक्षा आणि रोजगार आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.
  • नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ६ कोटी कामगारांनी पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे.

 

ई-श्रमवर नोंदणी कशी करायची?

  • केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई-श्रम पोर्टल लाँच केले.
  • ई-श्रम पोर्टलवर नोंदणीद्वारे, असंघटित क्षेत्रातील कामगार अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकतात आणि रोजगारातील कामगारांसाठी विविध अधिकारांचे वितरण आणि प्रवेश सुलभ करू शकतात.
  • ऑनलाइन नोंदणीसाठी, कामगार ई-श्रमचे मोबाइल अॅप्लिकेशन किंवा वेबसाइट वापरू शकतात.
  • याशिवाय कामगार सीएससी केंद्रे, राज्य सेवा केंद्रे, श्रम सुविधा केंद्रे, पोस्ट विभागाची निवडक पोस्ट ऑफिस आणि डिजिटल सेवा केंद्रांना भेट देऊनही आपली नोंदणी करू शकतात.

 

कामगारांना एकाच नोंदणीतून देशभर लाभ

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही डिजिटल ई-श्रम कार्ड दिले जाईल. याव्यतिरिक्त, कामगार ई-श्रम पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे त्यांचे प्रोफाइल देखील अपडेट करू शकतात. कामगारांना एक सार्वत्रिक खाते क्रमांक देखील असेल जो देशभरात स्वीकार्य असेल. तसेच या अंतर्गत नोंदणी केल्यानंतर कामगारांना सामाजिक सुरक्षेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.


Tags: E-shram portallabourersmuktpeethonline facilityregistrationworkersअसंघटित कामगारई-श्रम पोर्टलऑनलाइन रजिस्ट्रेशनकामगारकामगार मंत्रालयमुक्तपीठ
Previous Post

‘एल अँड टी’चे अध्यक्ष ए एम नाईक यांना ‘सर्वात उदार व्यावसायिक कॉर्पोरेट लीडर’ म्हणून नामांकन

Next Post

विधवांची लक्ष्मी म्हणून पूजा करत परंपरेला जोरदार धक्का!

Next Post
Widows Laxmi Pujan

विधवांची लक्ष्मी म्हणून पूजा करत परंपरेला जोरदार धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!