मुक्तपीठ टीम
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी बनवण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत ६ कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. कामगार मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका ट्वीटमध्ये ही माहिती दिली आहे. कामगार मंत्रालयाच्या ट्वीटनुसार, ई-श्रम पोर्टलवर ६ कोटी नोंदणी पूर्ण झाली आहे.
ई-श्रम पोर्टल नोंदणीचा कामगारांना फायदा
- असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे.
- स्थलांतरितांसह असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करु शकतात.
- हे कामगार अनेक सामाजिक सुरक्षा आणि रोजगार आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.
- नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ६ कोटी कामगारांनी पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे.
ई-श्रमवर नोंदणी कशी करायची?
- केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई-श्रम पोर्टल लाँच केले.
- ई-श्रम पोर्टलवर नोंदणीद्वारे, असंघटित क्षेत्रातील कामगार अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकतात आणि रोजगारातील कामगारांसाठी विविध अधिकारांचे वितरण आणि प्रवेश सुलभ करू शकतात.
- ऑनलाइन नोंदणीसाठी, कामगार ई-श्रमचे मोबाइल अॅप्लिकेशन किंवा वेबसाइट वापरू शकतात.
- याशिवाय कामगार सीएससी केंद्रे, राज्य सेवा केंद्रे, श्रम सुविधा केंद्रे, पोस्ट विभागाची निवडक पोस्ट ऑफिस आणि डिजिटल सेवा केंद्रांना भेट देऊनही आपली नोंदणी करू शकतात.
कामगारांना एकाच नोंदणीतून देशभर लाभ
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही डिजिटल ई-श्रम कार्ड दिले जाईल. याव्यतिरिक्त, कामगार ई-श्रम पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे त्यांचे प्रोफाइल देखील अपडेट करू शकतात. कामगारांना एक सार्वत्रिक खाते क्रमांक देखील असेल जो देशभरात स्वीकार्य असेल. तसेच या अंतर्गत नोंदणी केल्यानंतर कामगारांना सामाजिक सुरक्षेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.