Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळांची फी ५० टक्क्यांनी कमी करा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

अ‍ॅड. अमोल मातेले घेणार शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट

May 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
amol matele

मुक्तपीठ टीम

कोरोना आणीबाणीच्या परिस्थितीत अनेकांच्या रोजगारावर टाच आल्याने तसेच अनेक कंपन्यांकडून पगारात कपात होत असल्याने खासगी शाळांकडून आकाण्यात येणारी मनमानी (फी) शुल्क ५० टक्के करावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. या मागणीचे रितसर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात येणार आहे.

कोरोना संकटात शाळा बंद असतानाही आभासी अर्थात ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली सीबीएसई, आयसीएसई तसेच अन्य खासगी शाळा मनमानी फी आकारत असल्याने या प्रश्नावर राष्ट्रवादीने आवाज उठवला होता. ही मनमानी फी वसूली तसेच पालकांच्या खिशावर टाकण्यात येणारा दरोडा या संदर्भात राज्य सरकारे हस्तक्षेप करून, पालकांना दिलासा देण्याची मागणी अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नेमकी मागणी काय?

पालक शाळा व्यवस्थापन यांच्यात माागील वर्षभर रंगलेल्या (फी) शुल्कवादावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला. यामध्ये किमान १५ टक्के शुल्क सवलत देण्याचा निर्णय देऊन पालकांना अंशत: दिलासा देण्यात आला आहे. मात्र हे शुल्क ५० टक्क्यांपर्यंत कमी व्हावे आणि पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अ‍ॅड अमोल मातेले यांनी लावून धरली आहे. शाळा व्यवस्थापन जर का ५० टक्के शुल्क कमी करण्यासाठी तयार असेल तर काही जबाबदारी शासनाने उचलावी, अशी मागणी मातेले यांनी केली आहे.

देशात करोनाचा प्रसार झपाट्याने वाढल्यानंतर मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील पालकांनी शाळांच्या मनमानी फी आकारणीला विरोध केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही पालकांच्या या उठावात साथ दिली. असंख्य पालकांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड अमोले माातेले यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या. या व्यथा मातेले यांनी अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गाकवाड यांच्यापुढे मांडल्या होत्या.

 


Tags: Avd. amol matelechief minister uddhav thackeraycoronaEducation Minister Varsha GaikwadNCPअ‍ॅड. अमोल मातेले
Previous Post

न्यायाधीशांनी न्यायालयात सुनावला अमिताभचा डायलॉग…”नो मिन्स नो…नाही म्हणजे नाहीच!”

Next Post

प. बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका!

Next Post
Ashok chavan

प. बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!