Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळांप्रमाणे महाविद्यालयांचीही फी ५० टक्के कमी करण्याची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mv 2

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या या भयावह परिस्थिती गेल्यावर्षी देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग भरवणाऱ्या शाळांनी फी मध्ये कपात करावी अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील फी ५० टक्के कमी करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उच्च तंत्र शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र पाठवून केली. यापूर्वी त्यांनी खाजगी शाळांकडून आकारण्यात येणाऱ्या मनमानी फी मध्ये ५० टक्के कपात करावी अशी मागणी केली होती.

शालेय शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील फी ५० टक्के कमी करावी, ही मागणी करताना अ‍ॅड अमोल मातेले यांनी सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून शालेय शुल्क (फी) १५ टक्के कमी करण्याच्या निकालाचा दाखला दिला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने याआधीच राज्यातील शाळांची फक्त फी १५ नव्हे तर ५० टक्के कमी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आता याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागातंर्गत चालवणारी जाणारी कनिष्ठ महाविद्यालये तसेच उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या अख्त्यारितील कॉलेजांची फी देखील ५० टक्के कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अ‍ॅड अमोल मातेले यांच्या मते, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शाळा, कॉलेजात शिक्षण घेणार्‍या आपल्या पाल्याची फी कशी व कुठून भरावी, असा यक्षप्रश्न पालकांपुढे आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनने अनेकांच्या रोजगारावर गदा आणली आहे. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत असले तरी पगार अर्धा येत असल्याने महिन्याचे घरखर्च व इतर खर्च भागवतांना प्रत्येकाची पंचाईत होत आहे. शाळा कॉलेज बंद असल्याने कोरोना महामारीत ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून फी वसुली सुरू आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगितले आहे. त्यामुळे कॉलेजांची फी देखील ५० टक्के कमी करून राज्य सरकार कोरोना परिस्थितीत गांजून गेलेल्या जनतेला दिलासा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.


Tags: Avd. amol matelecollege feescoronaअमोल मातेलेकोरोनाराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
Previous Post

दिव्यांगाच्या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन

Next Post

‘खेळ मांडला’ ही बाप – लेकीची अनोखी कथा फक्त मराठी वाहिनीवर!

Next Post
khel mandala

'खेळ मांडला' ही बाप - लेकीची अनोखी कथा फक्त मराठी वाहिनीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!