मुक्तपीठ टीम
लोकप्रिय शाओमीच्या रेडमी ब्रँडने गुरुवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनेक प्रोडक्ट्स लॉन्च केले. यात कंपनीने रेडमी के४० सीरीजचा स्मार्टफोन लॉन्च केला. यासोबतच कंपनी तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहे. याव्यतिरिक्त ८६ इंचाचा रेडमी मॅक्स टीव्हीसुद्धा लॉन्च केला आहे. हा रेडमीचा दुसरा सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही आहे. खास फीचर्स सह कंपनीने हा टीव्ही लॉन्च केला आहे.
रेडमी मॅक्स टीव्हीचे फीचर्स
- रेडमी मॅक्स टीव्हीमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ८६ इंचाचा एलईडी-बॅकलिट एलसीडी डिस्प्ले आहे.
- हा स्मार्ट टीव्ही १०-बिट रंग, एचडीआर, एचडीआर १०, एचडीआर १०+ आणि एचएलजी सपोर्टसह येतो.
- यात खास फीचस म्हणून एमईएमसी (मोशन एस्टीमेशन आणि मोशन कॉम्पेन्सेशन) ची सुविधा देण्यात आली आहे.
- हा टीव्ही क्वाड कोर प्रोसेसरवर कार्य करतो आणि २ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज आहे.
- या टीव्हीला दोन स्पीकर दिले आहे. ते २५ वॉटचे आहेत.
- या टीव्हीत ३ एचडीएमआय पोर्ट सोबत सोनी पीएस५ सोबत जबरदस्त गेमिंग एक्सपिरीयन्स साठी Microsoft Xbox Series X सपोर्ट दिले आहे.
किंमतीबद्दल
चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेला हा ८६ इंचाची रेडमी मॅक्स टीव्हीची किंमत ७,९९९ युआन म्हणजेच सुमारे ९०,१३९ रुपये आहे. टीव्ही कंपनीच्या चिनी वेबसाईटवरही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तथापि, अन्य देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.