मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/ सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/ पीएसडब्ल्यू/ मानसोपचार नर्स, प्रकल्प समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, काउंसिलर, अटेन्डट या पदांवर एकूण ९८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नागपूर, पुणे, ठाणे आणि बीड आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) एमडी मानसोपचार २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.2- एमडी मानसोपचार
- पद क्र.३- मानसशास्त्र विषयात एमए/ एमएससी किंवा एमए/ एमएसडब्ल्यू किंवा एमएससी मानसोपचार नर्सिंग
- पद क्र.४- बीई किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा+आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा ०२ वर्षे अनुभव किंवा एमसीए
- पद क्र.५- कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा
- पद क्र.६- समाजशास्त्र/ मानसशास्त्र विषयात एमए किंवा मानसशास्त्र/समाजशास्त्र/नर्सिंग पदवी + मानसिक आरोग्य कार्यात ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ६१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- नागपूर- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर, प्लॉट नंबर २, सेक्टर- २०, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिन: ४४११०८
- पुणे- आर एन जी रोड, विश्रांतवाडी, आरटीओ ऑफिस जवळ, फुले नगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र ४११००६
- ठाणे- वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे, ज्ञान साधना महाविद्यालयाजवळ, एलबीएस रोड वागळे इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४
- बीड- सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरेग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/1035/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1M7rdZl2xwnpOfWUIjtqCpwdd_NoZIdId/view