मुक्तपीठ टीम
पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन, आणि इतर पदांसाठी एकूण १९५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, डीएम/ एमडी/ एमएस/ डीसीएच/ डीएनबी/ एमबीबीएस/ बीएएएमएस/ एमएसडब्ल्यू/ पदवीधर/ बीकॉम/ डीएमएलटी/ १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचे ठिकाण
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे
अधिक माहितीसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://zppune.org/pgeHome.aspx वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Ej-IlHWqyjryeGpy_tkNSKP7fBkzna_K/view