मुक्तपीठ टीम
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीजीसीआयएल) ने डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल / सिव्हिल)च्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण ३५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल / सिव्हिल) या पदांवर अर्ज करणारा उमेदवार, किमान ७०% गुणांसह मान्यता प्राप्त टेक्निकल बोर्ड / इन्स्टिट्यूट मधून पूर्णवेळ नियमित ३ वर्षे डिप्लोमा केलेला असावा. तसेच डिप्लोमासह बी.टेक. / बी.ई. / एम.टेक / एम.ई इत्यादी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वय ३२ वर्षांपर्यंत असावे.
अर्ज कसा करावा
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल / सिव्हिल) पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना
१. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीजीसीआयएल) च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
२. यानंतर करिअर विभागात क्लिक करा.
३. यानंतर जॉब अपॉर्च्यूनिटीजवर क्लिक करा.
४. ओपनिंग वर क्लिक करा.
५. आता रिजनल ओपनिंग, दिल्ली भरती आणि त्यानंतर डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल / सिव्हिल) पदासाठी भरतीसाठी अर्ज करा.
६. येथे संपूर्ण तपशील प्रविष्ट करा.
७. जेव्हा आपला फॉर्म भरला जाईल, तेव्हा त्याचे प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.powergrid.in वरून माहिती मिळवू शकता.