मुक्तपीठ टीम
कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये फायनान्स विषयात डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेप्युटी एफ ए अॅंड सीएओचे प्रत्येकी एका पदावर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- फायनान्स विषयात डेप्युटी जनरल मॅनेजर- १) अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून अकाउंट आणि फायनान्सचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. २) किमान ७ वर्षांचा अनुभव असावा.
- डेप्युटी एफ ए अॅंड सीएओ- १) या पदसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अकाउंट अॅंड फायनान्सचे शिक्षण पूर्ण केलेले आसावे. २) संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कारण, ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.
मुलाखतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- बायोडाटा
- दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातिचा दाखला
- आधार कार्ड, लायसन्स सारखे ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
मुलाखतीचा पत्ता
ही मुलाखत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, ६ वा मजला, प्लॉट क्र.६, सेक्टर-११, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे होणार आहे.
अधिक माहितीसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications वरून माहिती मिळवू शकता.
पाहा: https://konkanrailway.com/uploads/vacancy/1658491833NOTIFICATON_DGM_DFA_04_2022.pdf