मुक्तपीठ टीम
व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये नर्स ए (महिला) या पदासाठी १ जागा, सब ऑफिसर ‘बी’ या पदासाठी १ जागा, ड्राइव्हर (ओजी) या पदासाठी ३ जागा, वर्क असिस्टंट या पदासाठी ५ जागा, कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी २ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१ या पदासाठी ११ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२ या पदासाठी २९ जागा अशा एकूण ५२ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १२वी उत्तीर्ण+ नर्सिंग अॅन्ड मिडवाइफरी डिप्लोमा + ग्रेड ए नर्स नोंदणी किंवा बी.एससी (नर्सिंग)
२) पद क्र.२- १) १२वी (सायन्स+केमिस्ट्री)उत्तीर्ण २) नागपूर येथून सब-ऑफिसरचा कोर्स ३) १२/१५ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) हलके व अवजड वाहन चालक परवाना ३) ३ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १०वी उत्तीर्ण
५) पद क्र.५- १०वी उत्तीर्ण
६) पद क्र.६- ६०% गुणांसह बी.एससी (फिजीक्स)/ ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
७) पद क्र.७- १) ६०% गुणांसह १०वी/१२वी (पीसीएम) उत्तीर्ण २) आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/मशीनिस्ट/फिटर/आरइएफएफ. अॅन्ड एसी) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे, पद क्र.२ साठी १८ ते ४० वर्षे, पद क्र.३ साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.४ साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.५ साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.६ साठी १८ ते २४ वर्षे, पद क्र.७ साठी १८ ते २२ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर इतर उमेदवारांकडून पद क्र. २ आणि ६ साठी १५० रूपये शुल्क आकारले जातील तर पद क्र.१, ३, ४, ५ साठी १०० रूपये शुल्क आकारले जातील.
अधिक माहितीसाठी
व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरच्या अधिकृत वेबसाइट https://www.vecc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: