मुक्तपीठ टीम
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात एक्झिक्युटिव्ह या विभागात सेफ्टी असिस्टंट मॅनेजर पद, नॉन-एक्झिक्युटिव्ह विभागात बॉयलर ऑपरेटर कम टेक्निशियन, माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, माइनिंग मेट, ट्रेनी फायर ऑपरेटर, फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर ट्रेनी, अटेंडंट-कम-टेक्निशियन ट्रेनी, मेकॅनिकल ऑपेरटर-कम-टेक्निशियन, मेटलर्जी ऑपेरटर-कम-टेक्निशियन, इलेक्ट्रिकल ऑपेरटर-कम-टेक्निशियन, सिव्हिल ऑपेरटर-कम-टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन ऑपेरटर-कम-टेक्निशियन, फिटर अटेंडंट-कम-टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन अटेंडंट-कम-टेक्निशियन, मशिनिस्ट अटेंडंट-कम-टेक्निशियन या पदांसाठी एकूण ३३३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) बीई/ बीटेक २) फायर सेफ्टी पीजी पदवी/ डिप्लोमा ३) २ वर्षे अनुभव ४) ओडिया भाषेचे पुरेसे ज्ञान
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) इंजिनीअरिंग डिप्लोमा ३) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा ३) फोरमन प्रमाणपत्र ४) १ वर्ष अनुभव
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा ३) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र ४) १ वर्ष अनुभव
- पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग मेट प्रमाणपत्र ३) १ वर्ष अनुभव
- पद क्र.६- १) कोणत्याही शाखेतील पदवी/ इंजिनीअरिंग डिप्लोमा २) सब ऑफिसर कोर्स ३) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना ३) १ वर्ष अनुभव
- पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना ३) १ वर्ष अनुभव
- पद क्र.९ ते १३- १) १०वी उत्तीर्ण २) मेकॅनिकल/ मेटलर्जी/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा ३) १ वर्ष अनुभव
- पद क्र.१४ ते १६- १) १०वी उत्तीर्ण २) फिटर/इलेक्ट्रिशियन/ मशिनिस्ट क्षेत्रात आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून ७०० रूपये आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
- पद क्र.२,३,४,६,९,१०,११,१२,१३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून ५०० रूपये आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
- पद क्र.५,८,१४,१५,१६ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://sailcareers.com/notification?app_id=UElZMDAwMDAwMQ==
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/15NKhXaporEECVqmYYJBNE-yQFAqfyE82/view