मुक्तपीठ टीम
भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबी मुंबई अंतर्गत कायदा सल्लागार, मुख्याधिकारी, प्रमुख अधिकारी, प्रधान गुंतवणूक अधिकारी, लीड स्पेशलिस्ट, सांख्यिकीशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, खरेदी अधिकारी, ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन ऑफिसर, गुंतवणूक सहयोगी, जोखीम विश्लेषक, जोखीम अधिकारी, सल्लागार, माहिती सुरक्षा प्रशासक, संपर्क अधिकारी या पदांसाठी एकूण २१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- कायदेशीर सल्लागार – कायद्याची पदवी
- मुख्याधिकारी, प्रमुख अधिकारी, प्रधान गुंतवणूक अधिकारी, लीड स्पेशलिस्ट, गुंतवणूक सहयोगी या पदांसाठी अर्थशास्त्रात एमबीए / पीजीडीएम / सीए / सीएफए / पीजी
- सांख्यिकीशास्त्रज्ञ – सांख्यिकी/ गणित/ अर्थशास्त्र मध्ये पीजी
- डेटा सायंटिस्ट – बी. टेक/ एम. टेक/ एमई
- खरेदी अधिकारी – बी.ई/ बी.टेक
- ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन ऑफिसर – पदवीधर
- जोखीम विश्लेषक आणि जोखीम अधिकारी या पदांसाठी एमबीए/ पीजीडीएम इन फायनान्स
- सल्लागार – सिव्हिल/ इलेक्ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवीधर
- माहिती सुरक्षा प्रशासक – संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक आणि टेल कम्युनिकेशनमधील अभियांत्रिकी पदवीधर
- संपर्क अधिकारी – पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होणार असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ईमेलपद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता
recruitment@sidbi.in
अधिक माहितीसाठी महाफॉरेस्टच्या अधिकृत वेबसाइट https://www.sidbi.in/en वरून माहिती मिळवू शकता.